गणेशोत्सवापूर्वी सुरळीतरित्या विमानप्रवास सुविधा उपलब्ध करुन देणार…!

Read Time:3 Minute, 10 Second

सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांची घोषणा..

मुंबई-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावरुन सध्या सुरु असलेली विमान प्रवासाची सुविधा नियमित, सुरळीतपणे आणि अधिक फे-यांच्या स्वरुपात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना उपलब्ध करुन देणार असून त्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारकडे करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी मंगळवारी मंत्रायलयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

चव्हाण म्हणाले, पर्यटन जिल्हा म्हणून महत्वपूर्ण असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हयातील रोजगार वृद्धी तसेच स्थानिकांच्या प्रवासाच्या सोयीच्यादृष्टीने चिपी विमानतळावरील विमान प्रवास सेवा ही निश्चितच महत्वाची आहे. विशेषतः गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात येणा-या चाकरमानी,पर्यटकांच्या सोयीच्या दृष्टीने देखील ही विमानप्रवास सेवा अधिक जास्त प्रमाणात उपलब्ध असणे आवश्यक आहे. मात्र सध्या या ठिकाणी पाहिजे त्या प्रमाणात सुरळितरित्या विमान प्रवास सेवा प्रवाश्यांना उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याचा सबंधित अधिका-यांशी आढावा घेऊन त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी आढावा बैठक नुकतीच घेण्यात आली आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

याबाबत सरकारची धोरणात्मक निर्णय घेण्याची भूमिका आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या रोजगार संधी विस्तारण्यासोबतच स्थानिक प्रवाशांच्या सोयीच्यादृष्टीनेही चिपी विमानतळावरुन पुरेशा प्रमाणात विमान प्रवास सेवा सुरु करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल. याबाबत लवकरच ठोस निर्णय घेण्याच्या दृष्टीने केंद्राकडे मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात पाठपुरावा केल्या जाईल,असेही मंत्री चव्हाण यांनी यावेळी नमूद केले.
…………………………….(समाप्त)……………..

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *