निवडणुका कधीही लागू शकतात तयारीला लागा उद्धव ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना आदेश

Read Time:2 Minute, 26 Second

मुंबई, -मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या पदाधिकाऱ्यांची बुधवारी मातोश्री निवासस्थानी ठाकरे गटाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करीत असताना निवडणुका कधीही लागू शकतात त्या दृष्टिकोनातून कामाला लागा असे आदेशच पदाधिकाऱ्यांना दिले.

सर्वच राजकीय पक्ष हे आपल्या कार्यकर्त्यांना नेहमीच चार्ज करण्यासाठी निवडणुकांच्या पूर्वतयारीसाठी कामाला लागा अशा प्रकारचे आदेश देतच असतात. मातोश्री निवासस्थानी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक झाली या बैठकीसाठी मुंबई आणि मुंबईच्या आसपासचे एम एम आर रिझन मधील पदाधिकारी उपस्थित होते. बैठकी दरम्यान पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या कामासाठी तयार राहण्याचे आदेशच आज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले.

महाविकास आघाडीचे काय करायचे ते आम्ही बसून ठरवू…

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर असताना कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार हे देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते.यावरून उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी नाराज असल्याचे त्यांनी ठाकरे यांनाही सांगितल्याचे सूत्रांकडून कळते.महाविकास आघाडीच काय करायचं याबद्दल आम्ही बसून ठरवू असं देखील ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना सांगितले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ची दुटप्पी भूमिका ही आपल्याला आगामी अडचणीची ठरू शकते.त्या दृष्टिकोनातून आपण तयारीला लागलो पाहिजे असे आदेश देखील ठाकरेंनी दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
………………………………..(समाप्त)………….

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *