जिल्हा सक्षमीकरण कार्यक्रमाला मंजुरी एकूण २ हजार २१२ कोटींचा कार्यक्रम

Read Time:2 Minute, 38 Second

मुंबई ,-राज्य सरकारने जागतिक बँकेकडे ‘मित्रा’मार्फत सादर केलेल्या जिल्हा सक्षमीकरण कार्यक्रमाच्या प्रस्तावाला केंद्र सरकारच्या आर्थिक व्यवहार मंत्रालयाने मंजुरी दिली असून सुमारे २ हजार ११२ कोटी रुपयांचा हा कार्यक्रम आहे. यासाठी १ हजार ४७८ कोटी रुपये अर्थसहाय्य जागतिक बँक देणार असून, उर्वरित हिस्सा राज्य सरकार देणार आहे. केंद्र सरकारने दिलेल्या या मंजुरीबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानले आहेत.

विविध जिल्ह्यांमध्ये क्षमता ओळखून त्यानुसार गुंतवणूक, त्यासाठी अंमलबजावणी आणि देखरेख प्रणाली विकसित करणे, त्यातून जिल्ह्यांमध्ये शाश्वत विकासाच्या संधी निर्माण करणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे. यातून जिल्ह्यांच्या आर्थिक विकासाच्या कक्षाही रुंदावणार आहेत.

डेटा व्यवस्थापन तंत्रज्ञान, सार्वजनिक गुंतवणुकीसाठी नियोजन, आर्थिक संसाधनांचा संस्थात्मक विनियोग, महसूली यंत्रणेचे सक्षमीकरण, नागरिक केंद्रीत सेवांचे सुलभीकरण, आर्थिक विकासात विविध घटकांचा सहभाग, या घटकांची क्षमता वृद्धी आदी या कार्यक्रमातून साध्य होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी जागतिक बँकेच्या शिष्टमंडळासोबत एक बैठक घेतली होती. केंद्रीय आर्थिक व्यवहार मंत्रालयाच्या मंजुरीमुळे आता जागतिक बँकेकडून मंजुरीच्या प्रक्रियेतील एक मोठा टप्पा पूर्ण झाला आहे. जागतिक बँकेच्या सहयोगाने राज्यात अनेक उपक्रम राबविले जात असून त्यात आणखी एक भर या कार्यक्रमाने पडणार आहे.

………………………………(समाप्त )…………….

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *