आता ३ ऑगस्टपर्यंत पीक विमा भरता येणार…! कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

Read Time:1 Minute, 59 Second

मुंबई, -पीक विमा भरण्यासाठी काही ठिकाणी तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने राज्य सरकारने केंद्र सरकारकडे याबाबत विनंती केली असता, पीक विमा ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी आता आणखी तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सोमवारी ट्विटद्वारे दिली.

या अगोदर पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी एक रुपयात पीक विमा अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती.

आजपर्यंत राज्यात तब्बल १ कोटी ५० लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी एक रुपयात आपला विमा अर्ज नोंदवून सहभाग घेतला आहे.मागील २४ तासात ७ लाख २० हजार शेतकऱ्यांनी आपला विमा अर्ज भरला आहे. मात्र काही ठिकाणी सर्व्हर डाऊन होणे व तत्सम तांत्रिक अडचणी येत असल्याचा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार शेतकरी कोणत्याही तांत्रिक बाबीमुळे विमा भरण्यापासून वंचित राहू नये, यादृष्टीने केंद्र सरकारकडे विनंती करून आता पीकविमा अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरण्यासाठी ३ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तर उर्वरित शेतकऱ्यांनी विहित वेळेत आपले विमा अर्ज नोंदवून घ्यावेत, असे आवाहनही कृषीमंत्री मुंडे यांनी केले.
……………………………..(समाप्त)………..…….

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *