मुंबई, -महाराष्ट्रात असलेल्या ऐतिहासिक खजिन्यांचे संवर्धन करण्याची गरज आहे. त्यासाठी राज्य शासनाने अशा संस्थांच्या मागे उभे राहण्याची गरज आहे.आता सध्या आम्हाला राज्य शासनाशी बोलणे अवघड आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि मी सुद्धा येथे आहे.आम्ही तिघांनी जर ठरवलं तर महाराष्ट्रात बदल होईल असा ठाम आशावाद राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी येथे व्यक्त केला.
वि.का.राजवाडे संशोधन मंडळाच्या वतीने येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित सहा ऐतिहासिक ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात प्रमुख पाहूणे म्हणून राष्ट्रवादीचे शरद पवार शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती होती.
यावेळी पवार म्हणाले की, मोडी विषयी उद्धव ठाकरेंना असलेली माहिती आणि त्यांच्या फोटोग्राफीची प्रशंसा केली. उद्धव ठाकरे यांना दुर्ग भ्रमंती बाबत अतिशय माहिती आहे. ऐतिहसिक गोष्टी अनेक त्यांना माहिती आहेत. त्यांच्याकडे फोटो देखील आहेत. उध्दव ठाकरे यांच्याबद्दल खूप आस्था आहे ते उत्तम फोटोग्राफर आहेत, अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरे यांचे कौतुकही केले.
यावेळी पवार यांनी म्हणाले वि.का. राजवाडे संशोधन मंडळ संस्थेच्या कार्याबद्दलही कौतुक केले.धुळ्यात जे काम चालू आहे ते वाढवणे गरजेचे असल्याचे सांगत,सध्या सरकारला सांगण अवघड आहे,परंतू मी उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात यांनी जर ठरवलं तर काही अडचण येणार नाही असे सुद्धा पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावर सविस्तर बोलताना पवार म्हणाले की आजचा हा अतिशय चांगला कार्यक्रम आहे.धुळेकराना धन्यवाद देतो. राजवाडे संशोधन धुळे ही महत्त्वाची कामगिरी करत आहे . यामध्ये शिवकालीन दुर्ग इ.ही सगळी पुस्तके अतिशय अभ्यास पूर्ण लिहिली आहेत. प्राथमिक शाळेत असताना मी मोडी हे आम्हाला शिकायला मिळाले. मी दक्षिणेत गेलो तेव्हा हे मला पाहायला मिळाले होते.मी मुख्यमंत्री असताना काही लोकांना या भाषेतील लिखाण संबंधात काही लोकांची नियुक्ती केली होती. मोडीतील जे लिखाण आहे त्याचे भाषांतर केले.साने गुरुजींच्या पुस्तकात असे अनेक उल्लेख आहेत.हा अतिशय दुर्मिळ खजीना आहे ह्या इतिहासाच्या पाऊल खुणांचे लिखाण केले गेले पाहिजेत. आम्ही ह्या खजिनांचे जतन करण्यासाठी ५० लाखांचे अनुदान जाहीर करतो असेही पवार यांनी यावेळी जाहीर केले.
………………………(समाप्त)……..
.
Average Rating