महसूल मंत्र्यांचे विधानसभेत आश्वासन.
मुंबई,_राज्यातील गायरान जमिनीवरील अतिक्रमणाबाबतच्या धोरणाला न्यायालयाच्या निर्देशाला अधीन राहून महिन्याभरात अंतिम स्वरूप देण्यात येईल, असे आश्वासन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिले.
कॉंग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी आज विधान परिषदेत गायरान जमिनीवरील अतिक्रमणाबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तर देताना विखे-पाटील यांनी गायरान जमिनीवरील अतिक्रमणावर कोणतीही कारवाई होणार नाही ही सरकारची भूमिका असल्याचे स्पष्ट केले.
आपण एक महिन्याभरापूर्वी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना अतिक्रमणधारक लोकांची घरे पाडण्याची कोणतीही कार्यवाही करू नये, अशा सूचना दिल्या आहेत.न्यायालयाने दिलेल्या निर्देशाच्या अधीन राहून याबाबतच्या धोरणाला महिन्याभरात अंतिम स्वरूप देण्यात येईल,असेही विखे पाटील यांनी यावेळी नमूद केले.
तत्पूर्वी, सतेज पाटील यांनी गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढणार नाही असे राज्य सरकार सांगत असले तरी, मात्र महसूल विभागाकडून अतिक्रमण हटवण्यासाठी वारंवार नोटीस काढल्या जात असल्याकडे सरकारचे लक्ष वेधले.या नोटिशीमुळे त्यामुळे लोक हवालदिल झाले आहेत.जनतेच्या डोक्यावरील ही टांगती तलवार दूर करण्यासाठी अतिक्रमणाच्या प्रश्नावर कायमस्वरूपी धोरण ठरवण्याची गरज आहे.याबाबत सरकारचे काय नियोजन आहे? असा प्रश्नही पाटील यांनी यावेळी उपस्थित केला.
………..(समाप्त)……………………………..
Average Rating