महापालिकेतील पालकमंत्री कार्यालय सुरूच राहणार

Read Time:2 Minute, 34 Second

मंगलप्रभात लोढा यांनी विधानसभेत विरोधकांना ठणकावले

मुंबई,-आजवर फक्त पालकमंत्र्यांसाठी उघडी असणारी बृहन्मुंबई महापालिकेची दारे, आज आमच्या निर्णयाने जनतेसाठी खुली झाली. कोणीही स्थानिक जनप्रतिनिधी महानगरपालिकेच्या कार्यालयात येऊ शकत नाही.नागरिकांच्या समस्या वॉर्ड ऑफिस मध्ये अडकून राहतात.त्यांना त्यांच्या हक्कांसाठी दाद मागायला मंत्रालयत जाण्यासाठी सुद्धा परवानगी लागते. हे सर्वच लक्षात घेऊन आज आम्ही जनतेच्या सोयीसाठी पालकमंत्री समस्या निवारण कक्ष उभा केला तर त्यामध्ये काय अडचण आहे? असा सवाल मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी शुक्रवारी विधानसभेत उपस्थित केला.

काँग्रेस पक्षाच्या आमदार वर्षा गायकवाड यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री लोढा यांनी हे स्पष्ट केलं कि हे कार्यालय फक्त जनकल्याणासाठी असून, येथे कोणतेही राजकीय कार्य होणार नाही. या कक्षामध्ये सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींचे स्वागत आहे. या कार्यालयाला कितीही विरोध झाला तरी, जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी हे कार्यालय सुरूच राहील, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

आम्ही हे कार्यालय जनतेच्या हितासाठी सुरू केले असून, त्यांच्या समस्या सोडवणे एवढाच या कार्यालयाचा उद्देश आहे. जे या निर्णयाचा विरोध करत आहेत, त्यांनी हे सुद्धा विचारले पाहिजे की, “महाविकास आघाडी सरकारच्या काळात काँग्रेस पक्षाचे आमदार व मुंबई शहरचे तत्कालीन पालकमंत्री अस्लम शेख यांना राहण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारितीला हायड्रॉलिक इंजिनियरचा बांगला कोणत्या उद्देशाने दिला होता?”अशी रोखठोक विचारणाही लोढा यांनी केली.
………………………..(समाप्त)……………..

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *