मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून बाळासाहेब थोरात भडकले

Read Time:4 Minute, 54 Second

प्रश्नोत्तराच्या तासाला मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांनी उपस्थित राहणे हा संकेत

मुंबई, -विधिमंडळाचे कामकाज हे सर्वोच्च असून या ठिकाणी जनतेचे प्रश्न सोडवले जातात. त्यामुळे निदान प्रश्नोत्तराच्या तासाला तरी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी उपस्थित राहायला पाहिजे, हा संकेत आता पाळला जात नाही.विधानसभा अध्यक्षांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाला सक्त शब्दात टाकीत दिली पाहिजे अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी सभागृहात केली.

आज दिवसाचे विधिमंडळाचे कामकाज सुरू होण्यापूर्वीच थोरात यांनी सभागृहात मंत्र्यांच्या अनुपस्थितीचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, हे सर्वोच्च सभागृह आहे. महाराष्ट्राचे प्रश्न इथे मांडले जातात, ते सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातात. या माध्यमातून शासन आणि यंत्रणा गतिमान होते. या अगोदर कायम प्रश्नोत्तराच्या तासाला बाकीची कामे बाजूला ठेवून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्वच मंत्री जातीने हजर राहायचे. आता जर मुख्यमंत्री प्रश्नोत्तराच्या तासाला सभागृहात येणार नसतील तर मग आमदार त्यांची काम घेऊन त्यांच्या दालनात जातात आणि सभागृहात त्यामुळे उपस्थिती कमी होते.ज्या सदस्यांना प्रश्न मांडण्याची संधी मिळाली आहे त्यांचे प्रश्न सुटत नाही, याकडे त्यांनी यावेळी लक्ष वेधले.

दरम्यान सभागृहात लक्षवेधी दरम्यानही थोरात यांनी मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून प्रश्न उपस्थित केला, ज्या त्या खात्याचे मंत्री जर उपस्थित नसतील तर मग लक्षवेधीला अर्थ काय उरतो. मंत्री जर असे सांगत असतील की सकाळी सहा वाजता मला उठावे लागते, तर सकाळी उठण्यात व उशिरापर्यंत काम करण्यास वावगे काय? आपण मंत्री झालो आहोत, त्यामुळे या गोष्टी कराव्यात लागतात. मंत्रीपदाच्या मोठेपणात या सर्व गोष्टी दडलेल्या आहेत.त्यामुळे किमान कामकाज मंत्र्यांनी तरी यासंदर्भात गांभीर्याने घेतले पाहिजे, अभ्यास केला पाहिजे आणि सदस्यांचे समाधान केले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

भिडेचा बंदोबस्त करा…

संभाजी भिडे नावाचा इसम राष्ट्रपित्यावर टीकाटिप्पणी करतो, संपूर्ण देशासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे सरकारने त्याचा आजच बंदोबस्त करावा आणि त्या संदर्भात सभागृहात निवेदन करावे, मागणीही थोरात यांनी यावेळी केली.

थोरात पुढे म्हणाले, संभाजी भिडे ही विकृती आहे. त्यांनी देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या संदर्भात अत्यंत अवमानकारक विधान केले असून जे समग्र देशासाठी अत्यंत अस्वस्थ करणारे आहे. संभाजी भिडे वारंवार असं बोलतो, त्याला पाठीशी नेमका कोण घालतो याचा शोध घेणे आवश्यक आहे.भिडेंचा हेतू महाराष्ट्राचे वातावरण अस्थिर करण्याचा आहे हे ओळखले पाहिजे.कोणाच्या राजकीय फायद्यासाठी तो वारंवार अशी विधाने करतो? आम्ही सभागृहात संभाजी भिडेवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सरकारने आजच या विषयावर कारवाई करावी आणि सभागृहाला सूचित करावे. अन्यथा आम्ही शांत बसणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी बोलताना दिला.
……………………….(समाप्त)…………..

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *