Read Time:1 Minute, 15 Second
मुंबई,-महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत सर्पदंश आणि अपेंडिक्स या आजारांचा समावेश करण्यात येत असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी गुरुवारी विधानसभेत आमदार दीपक चव्हाण यांनी विचारलेल्या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.
सावंत म्हणाले, राज्य शासनाने महात्मा फुले जन आरोग्य योजना सार्वत्रिक केली असून त्याअंतर्गत महाराष्ट्रात ५ लाखांपर्यंत मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.या योजनेअंतर्गत सध्या ९९६ आजारांचा समावेश असून त्याची संख्या १ हजार ३५६ केली जाणार आहे.तसेच या योजनेत समावेश करावयाच्या आजारांच्या निवडीसाठी एक विशेष समितीही गठीत करण्यात येईल असेही सावंत यांनी यावेळी नमूद केलें.
………………………….(समाप्त)………………..
0
0
Average Rating