मुंबई, -१७ जुलै रोजी सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनात च्या निमित्ताने आज दुसऱ्या आठवड्यात कामकाज सल्लागार कमिटीची बैठक घेण्यात आली. बैठकीला सर्वपक्षीय गटनेते देखील उपस्थित होते. या बैठकीत निर्णय घेण्यात आला की अधिवेशन ४ ऑगस्ट पर्यंत म्हणजेच पूर्ण वेळ कामकाज चालवले जाईल.
पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच आठवड्यात विनियोजन बिल आणि बरेचसे कामकाज झाल्यामुळे तिसऱ्या आठवड्यात अधिवेशन गुंडाळणार असल्याचे विरोधकांकडून बोलले जात होते. सत्ताधारी पक्ष हा अधिवेशनापासून पळ काढत असल्याचे देखील काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी बोलून दाखवले होते. परंतु आजच झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशन पूर्ण काळ चालवणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
मात्र या अधिवेशनात सोमवारी ३१ जुलै व मंगळवारी १ ऑगस्ट रोजी अधिवेशनाचे कामकाज नसणार असल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे यंदाचे पावसाळी अधिवेशन हे तिसऱ्या आठवड्यात देखील चालवले जाणार आहे. मात्र तिसऱ्या आठवड्यात फक्त दोन दिवसच अधिवेशनाचे कामकाज चालणार आहे.
………………………………….(समाप्त)……………………….
Average Rating