अध्यक्षांसमोरच थोरात यांनी सुनावले खडेबोल*
मुंबई,_नाशिक-मुंबईआधी मार्गावरील वाहतूक कोंडी वरून बुधवारआधी विधानसभेत सलग दुसऱ्या दिवशीही राडा बघायला मिळाला. भिवंडी चे आमदार रईस शेख यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर मंत्र्यांच्या उत्तरावर सभागृहाचे समाधान झाले नाही. आमदारांनी गोंधळ झालेला सुरुवात केली. आमदार जयकुमार रावल यांनी या विषयावर सभागृहातच चर्चा करण्याची मागणी केली, त्यानंतर मंत्र्यांनी नोंद घेतो असे उत्तर दिले. त्यावर संतापलेल्या बाळासाहेब थोरात यांनी अध्यक्षांसमोरच परिस्थितीचे गांभीर्य निदर्शनास आणून दिले.
थोरात म्हणाले, नाशिक मुंबई वाहतूक कोंडीच्या संदर्भात सभागृहात आपण काल चर्चा केली. अध्यक्षांनी स्वतःही चर्चा गांभीर्यपूर्वक ऐकली त्यानंतर काही निर्देशही दिले. मात्र तरीही वाहतूक कोंडीच्या परिस्थितीत तसूभर ही फरक पडायला तयार नाही. थोरात यांनी सभागृहात शाळकरी मुलांसोबत घडलेली घटना विशद केली. ते म्हणाले दुपारी बारा वाजता वाहतूक कोंडीत अडकलेली लहान लहान शाळकरी मुले सायंकाळी पाच वाजता वाहतूक कोंडीतून बाहेर पडली. हे अत्यंत चुकीचे आणि गंभीर आहे.
यानंतर भडकलेले थोरात म्हणाले की, मंत्र्यांचे गांभीर्य या विषयाबाबत दिसले नाही. अध्यक्षांनी सूचना देऊनही, अंमलबजावणी झालेली नाही. मंत्र्यांनी या विषयाबाबत गंभीर होणे गरजेचे आहे. ‘नोंद घेतली‘ किंवा ‘होय‘ अशी उत्तरे देऊन चालणार नाही, असा इशाराही दिला.
………………………………
पूर उपाययोजना बाबत दोन्ही राज्यांमध्ये
तातडीने मंत्री स्तरीय बैठक घ्यावी…..
-आमदार सतेज पाटील यांनी
कोल्हापुरातील संभाव्य पुरस्थितीवर वेधले लक्ष
मुंबई, दि.२६(अनंत नलावडे)-धरण क्षेत्रात असलेल्या पावसाच्या जोरामुळे कोल्हापूर, सांगली परिसरामध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. अलमट्टी धरणातील पाण्यामुळे गंभीर पूरपरिस्थिती उद्भवू नये यासाठी महाराष्ट्र व कर्नाटकची मंत्री स्तरीय बैठक तातडीने आयोजित करावी आणि अलमट्टी धरणाचा विसर्ग १ लाख क्युसेक्स पर्यंत वाढवण्याच्या सूचना देण्यात याव्यात अशी मागणी विधानपरिषदेतील कॉंग्रसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी बुधवारी सभागृहात केली.
कोल्हापूर – सांगली परिसरातील संभाव्य पूरस्थितीबाबत २८९ सूचना क्रमांक २ नुसार पाटील यांनी सरकारचे लक्ष वेधले. कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठली असून धोका पातळीकडे वाटचाल सुरु आहे. परिणामी कोल्हापूर सांगली जिल्ह्यात पुराची गंभीर परिस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे आवश्यकताही त्यांनी बोलून दाखवली.
अलमट्टी धरणातील पाण्यामुळे गंभीर पूरपरिस्थिती उद्भवू नये म्हणून उपाय योजना करण्यासाठी यापूर्वी दरवर्षी दोन्ही राज्यांची मंत्री समितीची बैठक घेण्यात येत होती. महापुरावर २०२१ व २०२२ मध्येही दोन्ही राज्यातील मंत्री स्तरावरील बैठका झाल्या होत्या. मात्र यावर्षी ही बैठक झालेली नसून ती तातडीने घेण्यात यावी. महापुराला कारणीभूत ठरणाऱ्या अलमट्टी धरणातील विसर्ग १ लाख क्युसेक्स पर्यंत वाढवण्याच्या सूचना कराव्यात. अलमट्टीतील पाण्याची उंची ५१६.७४ पर्यंत गेली असुन ती १५ ऑगस्ट पर्यत ५१७ वर स्थिर ठेवण्यासाठी कर्नाटक सरकारशी बोलावे, अशी आग्रही मागणीही पाटील यांनी केली.
त्यावर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी, पाटील यांची पूरग्रस्त जनतेच्या दृष्टिकोनातून गंभीर प्रश्न मांडला आहे. सरकारने याची गांभीर्याने दखल घेतली असून,याबाबत करावयाच्या उपाय योजनाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवेदन करतील असे त्यांनी सांगितले.
……………………….(समाप्त)…………
Average Rating