२० हजार निवृत्ती वेतनाचा शासन निर्णय दोन दिवसांत जारी करणार….! 

Read Time:2 Minute, 49 Second

मंत्री शंभूराज देसाई यांची विधानपरिषदेत घोषणा…

मुंबई_९ मे रोजी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेत निवृत्त पत्रकारांना दरमहा ११ हजार ऐवजी २० हजार रूपये निवृत्ती वेतन देण्याची घोषणा केली होती.मात्र त्याचा शासन निर्णय अजून जारी करण्यात आला नसल्याची बाब विधानपरिषद सदस्या प्रज्ञा सातव यांनी सभागृहात उपस्थित केला असता यासंदर्भातील शासन निर्णय येत्या दोन दिवसांत जारी केला जाईल, अशी घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी मंगळवारी विधान परिषदेत बोलताना केली.विधानपरिषदेत आज पत्रकारांच्या प्रश्नांसंदर्भात लक्षवेधी सूचना उपस्थित करण्यात आली होती. 

बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेत निवृत्तीचे वय  ५८ आणि २५ वर्षे अनुभव असा निर्णय करण्यात यावा अशी मागणी विधानपरिषद शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सदस्य सुनिल शिंदे यांनी केली. त्यानुसार तातडीने निर्णय घेवून जाचक अटी कमी केल्या जातील असे आश्वासनही मंत्री देसाई यांनी सभागृहात दिले.

स्व.शंकरराव चव्हाण पत्रकार सुवर्णमहोत्सवी कल्याण निधी हा ट्रस्ट असून यामध्ये सध्या ५० कोटींची तरतूद आहे.या निधी मध्येही लवकरच वाढ करण्यात येईल अशीही घोषणा मंत्री देसाई यांनी केली.डिजिटल माध्यमांसाठी केंद्राचे जे निकष आहेत. ते तपासून त्या धर्तीवर डिजिटल माध्यमांसाठी धोरण आखले जाईल, असेही त्यांनी यावेळी मान्य केले.

पत्रकारांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी अभ्यास गट स्थापन करण्याची घोषणाही देसाई यांनी केली. मात्र पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी येत्या डिसेंबर पर्यंत धोरणात्मक निर्णय घेण्याचे निर्देशही उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी यावेळी दिले.

………………………..(समाप्त)………………

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *