राज्यातील शिक्षकांची रिक्त पदे

Read Time:3 Minute, 40 Second

पवित्र’ प्रणालीद्वारे भरण्याची कार्यवाही सुरू….

मुंबई_राज्यातील शिक्षकांच्या रिक्त पदापैकी ३० हजार पदे ‘पवित्र’ प्रणालीद्वारे भरण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती राज्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांच्या रिक्त पदे भरण्यासंदर्भात सुधाकर अडबाले यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली.

केसरकर म्हणाले की,शिक्षण अभियोग्यता व बुद्ध‍िमत्ता चाचणीच्या (टेट) आयोजनाबाबतचे वेळापत्रक उच्च न्यायालयात सादर करण्यात आले होते.त्यानुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्ध‍िमत्ता चाचणी २२ फेब्रुवारी, २०२३ ते ३ मार्च,२०२३ या कालावधीत आयबीपीएस कंपनीमार्फत घेण्यात आली असून, या परीक्षेमध्ये उमेदवारांस प्राप्त गुणांकनाच्या आधारे राज्यात अंदाजे ३० हजार शिक्षकांची पदे भरण्याची कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले 

यानुसार जिल्हा परिषदांच्या बिंदुनामावली व विषयांची माहिती पोर्टलवर भरून पदभरती करण्याचा कार्यक्रम असा आहे, जाहिरात देण्याचा कालावधी १५ आगस्ट ते ३१ आगस्ट पर्यंत उमेदवारांना जाहिरातीनुसार जिल्हा परिषदांना प्राधान्यक्रम देणे. १ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर पर्यंत मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह पदभरतीची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे,१९ सप्टेंबर पर्यंत मुलाखतीशिवाय पदभरतीतील उमेदवारांच्या कागदपत्राची पडताळणी करून पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश देणे. ११ ऑक्टोबर ते  २१ ऑक्टोबर पर्यंत पदस्थापनेसाठी समुपदेशनाचे आयोजन जिल्हास्तरावर करणे. व  २१ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर असे याचे वेळापत्रक तयार करण्यात आल्याची माहितीही केसरकर यांनी दिली.

तसेच शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ‘पवित्र’ प्रणालीमार्फत नियमित शिक्षकांची नियुक्ती होईपर्यंत निवृत्त शिक्षकांना मानधन तत्त्वावर तात्पुरती नियुक्ती देण्याबाबतच्या सूचना देखील आयुक्त (शिक्षण), सर्व विभागीय आयुक्त व मुख्य कार्यकारी यांना ७ जुलै २०२३ रोजीच्या शासन पत्रान्वये देण्यात आल्याचेही केसरकर यांनी नमूद केले.यावेळी झालेल्या चर्चेत भाई जगताप, ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी विविध उपप्रश्र्न विचारत सहभाग घेतला.

………………………..(समाप्त)………….

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *