उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी
मुंबई,_मुंबई शहर व उपनगरांतून वाहणाऱ्या मिठी नदीचे खोलीकरण,रुंदीकरण,संरक्षक भिंत व सुशोभिकरणाचे २००५ पासून काम सुरू असून २००५ ते २०२३ पर्यंतच्या संपूर्ण कामांची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करण्यात येणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत बोलताना सांगितले.
मिठी नदीचे खोलीकरण,रुंदीकरण,संरक्षक भिंत व सुशोभिकरण याबाबतची लक्षवेधी भाजपचे सदस्य प्रसाद लाड यांनी मांडली होती.
सामंत म्हणाले की,मिठी नदीच्या रुंदीकरण, खोलीकरण, संरक्षक भिंत व सुशोभिकरण हे काम एमएमआरडीए व मुंबई महानगरपालिका यांच्यामार्फत २००५ पासून सुरू आहे.परंतु,हे काम अद्यापही समाधानकारक झाले नसून अद्यापपर्यंत हे काम पूर्ण का झाले नाही.तसेच या नदीतील किती गाळ काढला व तो गाळ कोठे टाकला याबाबतची संपूर्ण चौकशी उच्चस्तरीय समितीमार्फत करण्यात येणार असल्याचीही घोषणा सामंत यांनी यावेळी केली.यावेळी झालेल्या चर्चेत प्रवीण दरेकर,अनिल परब,जयंत पाटील, विलास पोतनीस,भाई जगताप यांनीही उपप्रश्न विचारत सहभाग घेतला.
……………………….(समाप्त)………………….
Average Rating