मुस्लीम समाजाला मागालसेपणानुसार ५ टक्के आरक्षण लागू करा……

Read Time:2 Minute, 15 Second

प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष नसीम खान यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.

मुंबई,_काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने २०१४ साली मुस्लीम समाजाला मागासलेपणानुसार ५ टक्के आरक्षण दिले होते.परंतु नंतरच्या सरकारने हे आरक्षण कायम ठेवले नाही. हे आरक्षण धर्माच्या आधारित नाही,शैक्षणिक व शासकीय नोकऱ्यासाठी हे आरक्षण देण्यात आले होते.अल्पसंख्यक मुस्लिम समाजाच्या मागासलेपणानुसार मुस्लिम आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी माजी मंत्री व प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान यांनी मंगळवारी विधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून केली.

मुस्लीम समाजाला देण्यात आलेले आरक्षण सामाजिक, शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या मुस्लीम समाजाला देण्यात आले होते.उच्च न्यायालयानेही विशेष मागास प्रवर्ग अ अंतर्गत सामिल करुन शैक्षणिक आरक्षण बहाल केले व नोकरीतील आरक्षण पुढील आदेश येईपर्यंत स्थगिती दिली होती. मागील ९ वर्षांपासून यासाठी पाठपुरावा करत आहे. मुस्लीम समाजात ५० घटक आहेत, याचा सर्वंकष विचार करुन मुस्लीम समाजातील विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी विनंतीही खान यांनी केली. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तपासणी करुन योग्य तो निर्णय घेऊ असे आश्वासन दिल्याची माहिती नसीम खान यांनी येथे प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.

………………………….(समाप्त)…………..

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *