महिला व बालविकास विभागाच्या आयुक्तांची

Read Time:1 Minute, 46 Second

बालसुधार गृहास अचानक भेट देत पाहणी   

मुंबई, दि.१४:-  पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग (बालसुधार) पुणे (येरवडा)येथील केंद्राला महिला व बालविकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी गुरुवारी रात्री अचानक भेट देत बालसुधारगृहात मुलांना प्रत्यक्ष मिळणाऱ्या सुविधांची पाहणी केली.

            भेटी दरम्यान मुलांची निवासाची सुविधा, त्यांना देण्यात येणारे भोजन यासह अन्य सुविधांसह सरकारकडून देण्यात येणारी मदत आणि बालसुधारगृहात मुलांना प्रत्यक्ष देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती डॉ. नारनवरे घेतली.

            बालसुधारगृहातील २२ विधि संघर्षग्रस्त मुलांशी आयुक्त डॉ. नारनवरे यांनी संवाद साधत त्यांची विचारपूस केली. तसेच ज्या ठिकाणी मुले राहतात त्यांचे लॉकर्स, स्वच्छतागृहाची तपासणी केली. याशिवाय स्वयंपाकगृहाची पाहणी आयुक्त डॉ. नारनवरे यांनी केली.

           बालविकासचे उपायुक्त राहुल मोरे, रचना व कार्यपद्धती अधिकारी गोविंद इसानकर, पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग (बालसुधार) केंद्राचे अधीक्षक दत्तात्रय कुटे, उपअभियंता नितीन पवार होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *