Read Time:58 Second
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातस्थळाला भेट देऊन पाहणी केली. समृद्धी महामार्गावर बुलढाणा येथे खाजगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसला झालेल्या भीषण अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झालाय, तर अन्य 8 जण जखमी झाले आहेत. या अपघातामागची कारणे त्यांनी यावेळी जाणून घेतली. तसेच समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघातांचा तज्ज्ञाकडून अभ्यास केला जाईल. तसेच हे अपघात होऊ नयेत यासाठी ठोस उपाययोजना करण्यात येईल असे यावेळी मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
0
0
Average Rating