समृद्धी महामार्गाच्या सदोष निर्मितीमुळे…..? विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा आरोप

Read Time:2 Minute, 50 Second

विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा आरोप

मुंबई_’नागपूरहून पुण्याला येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसला समृध्दी महामार्गावर बुलडाणा – सिंदखेड राजा येथे अपघात होऊन २५ हून अधिक प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद, वेदनादायी असून ही घटना सदोष निर्मितीमुळे आणि मानवी त्रुटींमुळे झाल्याचा आरोप करतानाच, शासनाने आतातरी यावर तातडीने उपाय योजना करून गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या दुःखद घटनेबद्दल बोलताना केली.

विरोधी पक्षनेते पवार आपल्या शोकसंदेशात पुढे म्हणतात की, समृद्धी महामार्गावर सुरुवातीपासून अपघातांची मालिका सुरु आहे. या अपघातात अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. समृद्धी महामार्गाच्या सदोष निर्मितीमुळे आणि मानवी त्रुटींमुळे हे अपघात घडत असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. मल

समृध्दी महामार्गावर बसचा टायर फुटल्याने बस दुभाजक व खांबाला धडकली आणि बसने पेट घेतला. या भीषण दुर्घटनेनंतर समृध्दी महामार्गावरील वाहनांच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा प्रकर्षाने ऐरणीवर आला आहे. अशा अपघातांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून राज्य शासनाने तज्ञांच्या सल्ल्याने यावर तात्काळ उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली असून आजच्या भीषण बस दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या प्रवाश्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,व त्यांच्या कुटुंबीयांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

दुर्घटनेत जखमी प्रवाशांना शासनामार्फत चांगले उपचार मिळून ते लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना करतो,’ अशा शब्दात ही पवार यांनी आज समृध्दी महामार्गावर झालेल्या बस अपघाता बद्दल दुःख व्यक्त करून अपघातात मृत्यू पावलेल्या प्रवाश्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
………………………………………(समाप्त)…………………………

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *