आषाढी एकादशीच्या शुभदिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटूंब सहपरिवार विठ्ठलाची शासकीय महापूजा केली. सलग दुसऱ्या वर्षी सावळ्या विठुरायाचे मनोहर रूप डोळ्यात साठवून ठेवत त्यांची मनोभावे आराधना करण्याची संधी मिळाल्याबद्दल यावेळी त्यांनी विठुरायाचे आभार मानले.
राज्यात नुकतीच पावसाला सुरुवात झाली असून यंदाचे पर्जन्यमान समाधानकारक ठरावे आणि राज्यातील बळीराजा सुखी समाधानी व्हावा हे आणि एवढेच मागणे मी विठुरायाच्या चरणी मागितले तसेच राज्यातील जनता सुखी समाधानी आणि आनंदी रहावी हीच मागणी विठुरायाच्या चरणी मागितल्याचे सांगितले.
यंदा राज्यातील युती सरकारला एक वर्षे पूर्ण होत असून गेल्या वर्षभरात अनेक विघ्न अडचणी आल्या मात्र विठुरायाच्या आशीर्वादाने राज्यकारभार सुरळीतपणे करता येणे शक्य झाल्याचे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
पंढरपूर मंदिराच्या विकास आराखड्याबाबत सर्वांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेण्यात येणार नाही असे मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केले. तसेच पंढरपूरातील विठ्ठल रुक्मिणी मंदीरातील कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडवून त्यांना दिलासा देण्यात आला असल्याचे यावेळी बोलताना ससांगितले. तसेच पंढरपूर शहरातील प्रलंबित पाणीपुरवठा योजनेसाठी 109 कोटी तर शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी 108 कोटी रुपये मंजूर केल्याचे यासमयी जाहीर केले.
यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, आमदार भरतशेठ गोगावले आमदार समाधान अवताडे, आमदार मंगेश चव्हाण, विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे गहिनीमहाराज औसेकर तसेच त्यांचे सर्व सहकारी आणि वारकरी बंधू भगिनी उपस्थित होते.
Average Rating