Read Time:57 Second
मुंबई_केंद्रातील भाजप सरकारने प्रस्तावित केलेल्या समान नागरी कायद्याच्या संभाव्य परिणामांचा अभ्यास करण्यासाठी प्रदेश काँग्रेसने माजी राज्यसभा सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली.
या समितीत सदस्य म्हणून खासदार कुमार केतकर, माजी खासदार हुसेन दलवाई, माजी मंत्री वसंत पुरके, अनिस अहमद, प्रदेश पदाधिकारी किशोर गजभिये, अमरजीत मनहास, जेनेट डिसोझा आणि ऍड. रवि जाधव यांचा समावेश आहे. या समितीला बैठक घेऊन लवकरात लवकर अहवाल सादर करण्याची सूचना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
……………………………………….(समाप्त)………………………..
0
0
Average Rating