काही दिवसांपूर्वी मान्सून अंदमान निकोबारच्या समुद्रामध्ये दाखल झाला होता तसेच लवकरच तो केरळमध्ये दाखल होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली होती. त्यामुळे मान्सून राज्यात कधी दाखल होईल याकडे राज्यातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आता राज्यातील मान्सूनची स्थिती काय असणार आहे? याविषयी हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी आपला अंदाज जाहीर केला आहे.
🤔 राज्यात मान्सूनची स्थिती काय?
● पंजाबराव डख यांनी यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात आजपासून तीन दिवस मान्सून पूर्व पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच जून महिन्याच्या 1, 2, 3 तारखेला देखील मान्सून पूर्व पाऊस पडणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
● तसेच 8 जून रोजी महाराष्ट्रात मोसमी पावसाची दमदार हजेरी लावून यंदा चांगल्या प्रकारे पाऊस पडणार असल्याचे पंजाबराव डख यांनी म्हटलं आहे.
● त्यामुळे शेतकऱ्यांनी आता लवकर शेतीच्या मशागतीची कामे उरकून खरिपाच्या पेरणीसाठी सज्ज राहावे असेही पंजाबराव डख म्हणाले आहेत.
👍🏻 INDIANEXPRESS_YES सोबत Stay Updated
Average Rating