केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांचे भाकीत…!
मुंबई, _ज्या बिहारमधून जयप्रकाश नारायण यांनी संपुर्ण क्रांतीचा नारा दिला, जी बिहारची भूमी ही लोकशाहीची जननी आहे, त्याच बिहारमध्ये लोकशाहीच्या विरोधात षडयंत्र जे पक्ष करीत, परिवार वादासाठी जे एकत्र आले आहेत, त्यांचा तर देशातून होईलच पण बिहारमधूनही सुपडा साफ होईल, असे भाकीत केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी रविवारी संध्याकाळी उशिरा येथे एका कार्यक्रमात बोलताना वर्तविले.
मुंबई भाजपातर्फे आज वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा सभागृहात आणि बाणीचा निषेध करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांना आमंत्रीत करण्यात आले होते, तर राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार अतुल भातखळकर, सुनिल राणे, मनिषा चौधरी, अमित साटम, भारती लव्हेकर, महामंत्री संजय उपाध्याय, माजी खासदार किरिट सोमय्या आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आमदार योगेश सागर यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना आमदार अतुल भातकळकर यांनी हा काळा दिवस का लक्षात ठेवलाय हावा याचे महत्व विषद केले. तर मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आपल्या भाषणात आणिबाणीची दाहकता मांडली.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भाषण करताना आमदार अँड आशिष शेलार म्हणाले की, आज भाजपच्या सरकारवर जे जे खोटे आरोप केले जात आहेत, पुरस्कार वापसी केली जातेय, ते सगळे कॉंग्रेसने आणिबाणीच्या काळात करुन दाखवले आहे. निवडणुक यंत्रणेचा गैरवापर, न्यायालयांची मुस्कटदाबी, लेखन, भाषण स्वातत्र्यावर बंदी, मिडिया हाऊसवर बंदी हे ज्या कॉंग्रेसने केले तेच आज लोकशाही वाचवण्याची गोष्ट करीत आहेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
तर केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले की, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे संविधान दिले त्या घटनेच्या मुळ गाभ्याला धक्का लावून कॉंग्रेसने या देशावर आणिबाणी लादली, हा या देशाच्या घटनेचा अपमान तर होताच तसाच तो लोकशाहीचा आणि घटनाकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचाही अपमान करण्याचे काम कॉग्रेसने केले. एवढेच नव्हे तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न देतानाही कॉंग्रेसने असेच केले होते, याची आठवणही त्यांनी करून दिली.
परिवार वाचविण्यासाठी कॉंग्रेसने आपल्या देशावर
आणिबाणी लादली होती, आणि आजही आपआपला परिवार वाचविण्यासाठी बिहारमध्ये हे एकत्र येत आहेत. जे लालूप्रसाद यादव,नितिश कुमार आणि मुलायम सिंह आणिबाणीच्या विरोधात लढले तेच आज कॉंग्रेसच्या परिवार वादाला साथ देत आहेत. पण बिहारची भूमीही क्रांतीची भूमी आहे.ती यांचा पाखंडीपणा मान्य करणार नाही, बिहारची भूमीही नागरीकांच्या हक्कासाठी आवाज उठवणारी, मान, मर्यादांची भूमी आहे.ती यांच्या पाखंडीपणाला साथ देणार नाही. एकिकडे लोकशाहीच्या नावाने हे सगळे पक्ष गळा काढतात तर दुसरीकडे घराणेशाही वाचविण्यासाठी एकत्र येऊन लोकशाहीचाच गळा घोटण्याचे काम करीत आहेत, अशी दुटप्पी भूमिका घेणा-यांना देश तर माफ करणार नाहीच पण बिहारमधूनही यांचा येत्या काळात सुपडा साफ हाईल, असा इशाराही यादव यांनी यावेळी बोलताना दिला.
आज मी विदर्भातील अनेक भागात दौरा करुन कार्यक्रमासाठी आलो आहे. समाजातील विविध घटकांशी आम्ही संवाद साधला आहे.प्रत्येकजण मान्य करतोय की, उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेने भाजपाला धोका दिला होता. त्यामुळे आताच्या शिंदे- फडणवीस सरकारला प्रचंड जनसमर्थन महाराष्ट्रात मिळते आहे. असे निरिक्षणही त्यांनी नोंदवले. त्यांनी आपल्या भाषणात आणिबाणचा काळ आणि काँग्रेसने केलेले अत्याचार यावर सविस्तर विवेचनही केले.
…………………………..(समाप्त)…………….
Average Rating