कॉपी पेस्ट. सावध करण्यासाठी पोस्ट

Read Time:6 Minute, 37 Second

नमस्कार मी Kavita Joshi माझा Cake Tales या नावाने केक आणि चॉकलेट्स तसेच कॉर्पोरेट गिफ्टिंगचा बिझनेस आहे. मी फेसबुक वर तशी फार ऍक्टिव्ह नाहीये पण मला अगदीच काल परवा आलेला अनुभव तुमच्यासोबत शेयर करते. पोस्ट मोठी आहे पण नक्की वाचा.
दोन-तीन दिवसांपूर्वी मला एक फोन आला. बोलणारी महिला प्रिया शर्मा या नावाने आणि हिंदीतून बोलत होती. केकची ऑर्डर द्यायची आहे अशी इच्छा तिने व्यक्त केली आणि म्हणाली “मी इंडियन आर्मी मध्ये आहे आणि आता नुकतीच कोल्हापुरामध्ये जॉईन झाली आहे, माझ्या मुलीचा वाढदिवस आहे तर तुम्ही केकची ऑर्डर घेऊ शकता का?” मी म्हणाले की,” हो, ऑर्डर घेऊ शकते. तुम्ही ऍडव्हान्स पेमेंट करा (अनोळखी व्यक्तीची ऑर्डर ॲडव्हान्स न घेता कन्फर्म करायची नाही हा व्यवसायाचा अलिखित नियम) आणि ऑर्डर कन्फर्म करा.” तर त्यावर त्या म्हणाल्या की, “मी आर्मी मध्ये आहे आणि मला गुगल पे वापरण्याची परवानगी नाही किंवा कुठलेही ऑनलाईन पेमेंट मी करू शकत नाही. तर माझी रिक्वेस्ट आहे की माझी ऑर्डर तुम्ही तशीच कन्फर्म करा.” मलाही त्यांच्या बोलण्यावरून authentic वाटलं आणि ऑर्डर accept केली. काल केकची डिलिव्हरी होती त्यावेळी आमचा झालेला संवाद:
मी: “केकची डिलिव्हरी कुठे द्यायची आहे?”
त्या बाई: “डिलिव्हरी नको, मी स्वतः येऊन घेऊन जाईन.ऑर्डर रेडी आहे का?”
मी: “केक तयार आहे. केव्हाही घेऊन जा..”
त्या बाई: “तुमचे पेमेंट मी आधी क्लिअर करते आणि मग इथून केक घ्यायला येते.”
(आता मला थोडी शंका आली.)
मी: “तुम्ही कोणत्याही पद्धतीने ऑनलाईन पेमेंट करू शकत नाही, तर आज कसं करणार?”.
त्या बाई: “मी सुट्टी घेतली आहे आणि आमचे जे ऑफिसर आहेत बबलू सर त्यांना मी तुमचे पेमेंट क्लियर करायला सांगितलं आहे. तर तुम्हाला आर्मी कॅन्टीन थ्रू पेमेंट होईल”

मलाही ते खरं वाटलं त्यामुळे मी म्हटलं ठीक आहे. थोड्या वेळाने एका माणसाचा फोन आला.
व्यक्ती: “मी आर्मी ऑफिसर बबलू बोलतोय आणि प्रिया मॅडमची ऑर्डर तुमच्याकडे आहे ना? आणखी तुमचं पेमेंट किती आहे?”
(मी पेमेंटची रक्कम सांगितली)
व्यक्ती: “मी तुम्हाला पहिल्यांदा एक रुपया जमा करतो तो जमा, तो जमा झालाय का बघा आणि पुढचं पेमेंट मी नंतर करतो. आणि कॉल चालू ठेवा.”

आता वारंवार तो माणूस मला कॉल चालू ठेऊन आणि गुगल पे ऑपन करायला सांगत होता. मला आधीच Swarupa Swarupa Prajyot Joshi-Kulkarni ने (माझी जाऊ) सांगितलं होतं की “सध्या असे ऑनलाइन पेमेंट वर फसवणूक सुरू आहे आणि जर कोणीही कॉल सुरू असताना गुगल पे ओपन करायला सांगितलं तर अजिबात करू नकोस”

ती गोष्ट मला आठवली आणि मी त्यांना कॉल सुरू असताना गुगल पे ओपन करण्यास नकार दिला. त्यावर दोन-तीन वेळा त्या माणसाचा फोन आला तो म्हणाला, “मी तुम्हाला आर्मीचा चेक QR कोड ने पाठवला आहे, तो तुम्ही स्कॅन करा .तुम्हाला एक रुपया जमा होईल आणि मग उरलेले पेमेंट मी करतो.”
पण त्यावेळीही मलाही थोडं खटकलं की माझं पेमेंट होण्यासाठी माझा क्यु आर कोड त्यांनी स्कॕन करण आवश्यक असताना त्यांचा क्यूआर कोड मी का स्कॕन करायचा? मला शंका आली त्यामुळे मी तसे करण्यास साफ नकार दिला.
मग ते दोघेही खूप अस्वस्थ झाले. चिडचिड करायला लागले आणि चिडून मग ती महिला मला म्हणाली की, “तुमची बहाणेबाजी फार झाली, मला तुमचा केकच नको.” आणि मग त्यांनी रागाने फोन ठेवला.

आमचे एक स्नेही Kedar Joshi- जे आर्मी मध्ये होते, त्यांच्याकडे चौकशी केली की आर्मी मध्ये payment ची काय पद्धत आहे. त्यांनी सांगितलं की ‘आर्मी मध्ये अशी काही पद्धत नाही आणि ऑनलाइन payment वापरू शकतो. मला असा 4-5 ओळखीतल्या लोकांचा फोन आला होता, त्यांच्या बाबतीत पण असंच झालं आहे. Indian Army म्हणलं की लोक विश्वास ठेवतात आणि बळी पडतात.’

सध्या अशी एक टोळी आहे जी फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवर ऍक्टिव आहे. आणि तिथून माहिती मिळवून अशी फसवणूक केली जाते. अनेकांच्या बाबतीत अशी घटना घडली आहे. मला हे माहीत होतं की कॉल सुरू असताना ऑनलाइन payment साठी चे कोणतही अॕप ओपन करायचं नाही. म्हणून माझी फसवणूक होता होता वाचली. पण ज्यांना या गोष्टी माहिती नसतात त्यांची फसवणूक होऊ शकते, आणि एक झटक्यात खात्यावरचा संपूर्ण बॅलन्स संपू शकतो. या सगळ्यामध्ये indian army चे ही नाव बदनाम केलं जात आहे. त्यामुळे सगळ्यांनी सावध रहावे , आणि अशा कोणत्याही फोन वर विश्वास ठेवू नये. त्यांची ओळख पटवून देण्यासाठी त्यांनी आर्मी च्या युनिफॉर्म मधील DP ठेवला होता, truecaller ला पण नाव तेच होतं, जे त्यांनी सांगितलं. अशा पूर्ण तयारीनिशी हे लोक फोन करुन आपली फसवणूक करतात. तेंव्हा अशा कोणत्याही फोन ला कोणीही बळी पडू नये.
धन्यवाद!

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *