राज्यातील युवतींना मिळणार स्वसंरक्षणाचे धडे……गुरु पौर्णिमेपासून स्वसंरक्षण कार्यक्रम सुरू होणार

Read Time:5 Minute, 1 Second

महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांची घोषणा…..

मुंबई,_छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यात ३ लाख ५० हजार शाळकरी व महाविद्यालयीन युवतींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.महिला व बालविकास विभाग आणि राज्यातील सर्व विद्यापीठे व स्वयंसेवी संस्थेच्या सहाय्याने गुरू पौर्णिमाचे औचित्य साधून ३ ते १५ जुलै दरम्यान तीन दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी बुधवारी मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

यावेळी महिला व बालविकास विभागाचे उपआयुक्त राहुल मोरे ,उपसचिव श्री.ठाकूर, महिला व बालविकास विभागाचे अधिकारी,मुंबई विद्यापीठ, एस.एन.डी.टी.महिला विद्यापीठ,भारतीय स्त्री शक्ती संस्‍था आणि विद्यार्थी निधी ट्रस्ट यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

लोढा म्हणाले,अलीकडील काळात महिला व मुलींवर होणारे क्रुर हिंसाचार व त्यातून केली जाणारी त्यांची हत्या हे सरकार समोरील व समाजा समोरील आव्हान ठरत आहे.याला आळा बसण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे खुपच आवश्यक असून शाळकरी व महाविद्यालयीन युवतींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी राज्यात राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.महिला व बाल विकास आयुक्तांच्या मार्फत राज्यातील सर्व विद्यापीठे व स्वयंसेवी संस्थेच्या सहाय्याने महाविद्यालयीन युवतींसाठी तालुकास्तरावर विद्यापिठांच्या मदतीने स्वसंरक्षण शिबीरांचे आयोजन करण्यासाठी नियोजन करण्यात आलेले आहे.
युवतींचे मनोबल उंचविण्यासाठी तीन दिवस समुपदेशन सत्र आयोजित करण्यात येणार आहेत, अशी माहितीही लोढा यांनी यावेळी बोलताना दिली.

या तीन दिवसाच्या शिबीरानंतर ज्या युवतींना अधिक स्वसंरक्षणाच्या प्रशिक्षणात रुची असेल, अशा युवतींची संख्या लक्षात घेऊन त्यादृष्टीने पुढील दिवसीय स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन विभागामार्फत करण्यात येईल. असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

महात्मा गांधी प्रशासन प्रशिक्षण या स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला व बाल विकास आयुक्तांच्या स्तरावर अव्यावसायिक तत्वावर,विनाशुल्क आज मुंबई विद्यापीठ, एस. एन.डी. टी., भारतीय स्त्री शक्ती संस्‍था आणि विद्यार्थी निधी ट्रस्ट यांच्याशी सामंजस्य करार करण्यात आला. वेळोवेळी या प्रशिक्षण कार्यक्रमाची व्याप्ती वाढविण्यासाठी सर्व विद्यापीठे, स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी निधी ट्रस्ट, भारतीय स्त्री शक्ती संस्‍था यांचेसोबत आवश्यकतेनुसार सामजंस्य करार करण्यात येतील. या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व विद्यापीठ, स्वयंसेवी संस्थांना देखील या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आल्याचेही लोढा यांनी यावेळी नमूद केले.

राज्यातील सर्व अंगणवाडीमध्ये ४० लाख बालक,अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी उस्फूर्तपणे योग दिवस साजरा केला,अशीही माहिती लोढा यांनी दिली.
……………………………(समाप्त)…………….

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *