अमरावती येथून शिवसेनेच्या वर्धापन दिनासाठी मुंबईत आलेले तिवसा तालुक्याचे तालुकाप्रमुख धीरज अंबादास राजूरकर यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालाय

Read Time:1 Minute, 55 Second

मुंबई, सोमवारी अमरावती येथून शिवसेनेच्या वर्धापन दिनासाठी मुंबईत आलेले तिवसा तालुक्याचे तालुकाप्रमुख धीरज अंबादास राजूरकर यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालाय. काल कार्यक्रम संपल्यावर पुन्हा लॉजवर गेल्यानंतर अचानक ते कोसळले. दरम्यान त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याना तातडीने मुंबईतील जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

त्याची तातडीने दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी मुंबईतील जीटी रुग्णालयाला भेट देऊन धीरज राजूरकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. व त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. शिवसेना हा एक परिवार असून यातील प्रत्येक सदस्य हा आमच्यासाठी महत्वाचा आहे.धीरजचा आकस्मित मृत्यू हा आम्हाला सगळ्यांच्या जीवाला चटका लावून जाणारा आहे. तो पक्षाने दिलेला प्रत्येक आदेश प्रमाण मानून उत्तम काम करत होता. मात्र दुर्दैवाने काळाने त्यांच्यावर घाला घातला.आम्ही सगळे त्यांचे सहकारी आणि कुटूंबियांचा दुःखात सहभागी असून त्यांच्या कुटूंबाची संपूर्ण जबाबदारी शिवसेनेच्या वतीने स्वीकारत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी जाहीर केले.
…………………………..(समाप्त)………………..

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *