विदर्भ, मराठवाड्यासह कोकणातील अनेक सिंचन प्रकल्पांना उपमुख्यमंत्र्यांची मान्यता

Read Time:6 Minute, 17 Second

मुंबई_उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर नियामक मंडळाच्या ८३ व्या बैठकीत ४ हजार १९९ कोटी ७२ लाख रुपयांच्या ११ प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या. बैठकीत एकूण ७३ विषय मंजूर करण्यात आले.तसेच. २४० कोटी २ लाख रुपयांचे १२ दायित्व प्रस्ताव यावेळी मंजूर करण्यात आले.तर ८ सिंचन प्रकल्प सौर उर्जेवर कार्यान्वित करण्यासाठी ६८१ कोटी ६८ लाख प्रस्ताव मंजूर करण्यात आले. या सिंचन प्रकल्पांतर्गत विविध कारणांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई किंमत ३ कोटी ७९ लाख रुपयांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. शिवाय प्रकल्पाच्या भूसंपादन निवाड्यामधून सुटलेल्या मालमत्तांची मूल्यांकन रक्कम तसेच फळझाडे व वनझाडांचा मोबदला तसेच पूनर्वसनबाधीत कुटुंबांना मोबदल्यातून सुटलेल्या,मालमत्तांचे मोबदला रक्कम १४८ कोटी ४८ लाख रुपयेही मंजूर करण्यात आले.असे एकूण ५ हजार २७३ कोटी ६९ लाख रूपयांचे प्रस्तावही मंजूर करण्यात आले.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, सचिव आणि कार्यकारी संचालक रा. द. मोहिते, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ श्रीकर परदेशी उपस्थित होते.

मराठवाड्यातील ही अनेक प्रकल्पांना मंजुरी….

मराठवाड्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प वेगाने मार्गी लावण्यात यावेत, असेही निर्देश यावेळी देण्यात आले.

या बैठकीमध्ये सात्रापोत्रा साठवण तलाव, रेपेवाडी साठवण तलाव,केंद्रवाडी साठवण तलाव,सिंदफणा प्रकल्प,विष्णुपुरी प्रकल्प,लेंडी प्रकल्प,कृष्णा मराठवाडा प्रकल्प तसेच नाशिक जिल्ह्यातील वणी,जोरण या प्रकल्पातील उर्वरित कामांच्या अडीअडचणी सोडवून प्रकल्पाच्या कामास गती देण्याबाबत आवश्यक निर्णय घेण्यात आले.प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनविषयक अडचणी सोडविण्याच्या दृष्टीने लेंडी प्रकल्पातील क्षतिग्रस्त नागरी सुविधांसाठी सुमारे ३१ कोटी रुपयांच्या निधीसही मान्यता देण्यात आली.बैठकीमध्ये ४४ कोटी ५ लाख रुपये अतिरिक्त दायित्वासही मंजुरी देण्यात आली.

कृष्णा मराठवाडा प्रकल्प मार्गी लागण्यासाठी निरा खोऱ्यातील पाणी भिमा नदीमध्ये आणण्यासाठी आवश्यक ३४१ कोटी रुपये रकमेसही मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला.गोदावरी मराठवाडा प्रदेशातील १२५ कोटी ९७ लाख रुपये रकमेचे विशेष दुरुस्तीचे प्रस्ताव प्रशासकीय मान्यता घेण्यासाठी शासनास सादर करण्यासाठी मान्यता देण्यात आली.पश्चिम वाहिनी पार खोऱ्यातील पाणी गोदावरी नदीमध्ये आणण्यासाठी आवश्यक सर्वेक्षणाच्या कामाच्या २९ कोटी रुपये रकमेसही मान्यता देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, औरंगाबाद यांच्या नियामक मंडळाची ८१ वी बैठक झाली.यावेळी जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर,उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी,सचिव (लाक्षेवी) डॉ.संजय बेलसरे,कार्यकारी संचालक संतोष तीरमनवार,मुख्य अभियंता विजय घोगरे, मुख्य अभियंता जयंत गवळी, मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ हे उपस्थित होते.

कोकण सिंचन प्रकल्पांना ही भरीव निधी….

कोकण प्रदेशातील पूरनियंत्रणासाठी माहिती संपादन प्रणाली (Real Time data Acquisition system) ची सर्व २६ नदी खोऱ्यात उभारणी करण्यासाठी १२ कोटी रुपये निधी देण्यासही फडणवीस यांनी मान्यता दिली.

या बैठकीत कोकणातील सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी ३६ विषयांबाबत चर्चा होऊन मान्यतेचे निर्णय घेण्यात आले. गडगडी,तिलारी प्रकल्पांच्या भूसंपादन व प्रकल्पग्रस्तांना अनुदान,पुनर्वसित गावठाणातील नागरी सुविधांची दुरुस्ती कामांना मान्यता देण्यात आली.पाली-भूतावली, कोर्लेसातंडी, तिडे बेर्डेवाडी इत्यादी प्रकल्पाच्या कामांवरील वाढीव आर्थिक दायित्व सुमारे ९० कोटी रुपयासही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्यता दिली.

…………………………….(समाप्त)…………………

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *