मुंबई,_मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांनी भाजप दिल्लीतील श्रेष्ठी यांच्याच आशीर्वादाने मिळालेल्या स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा वर्धापन दिन जरी साजरा करीत असले तरी त्यांना लवकरच घरी बसावे लागण्याचा गौप्यस्फोट शिंदे यांच्या शिवसेनेच्या एका वरिष्ठ नेत्यांनेच आपले नाव न छापण्याच्या अटीवर आमच्या वार्तहारासोबत केला.
त्यांनी सांगितले की, ज्या दिवशी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले त्याच दिवशी ओरीजनल शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी त्यांच्या गोटात अगोदर सर्वात महत्त्वाचा माणूस म्हणून राहुल लोंढे याला पेरला. तसा तोही ज्या नवाकाळ नावाच्या वृत्त पत्रामध्ये बातमीदारी करायचा तिथेही त्याचे बिनसले होते. व तो आजही ठाणे परिसरात चीटर म्हणून ओळखला जातो. हवं असल्यास प्रताप सरनाईक यांना विचारा.
मग उद्धवजिनी हळूच उदय सामंत सारख्या विश्वासू सहकाऱ्याला पेरले. पण गाफील एकनाथ शिंदे या दोगांवरच अधिक विश्वास टाकू लागल्याने जे खरोखर शिंदेंकडे प्रेमाने आले होते त्यांचा हिरमोड होण्यास सुरुवात झाली. आपण कोणासाठीही व का आलो आहोत हेच त्यांना आता समजेनासे झाले आहे. मुख्यमंत्री बनून शिंदे यांच्या बंगल्यावर, त्यांच्या खासगी निवासस्थनी काय चर्चा होतात याचे रेपोर्टिग करण्यात येत आहे. इतकेच काय २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान शिंदे गटाचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर व उद्योग मंत्री उदय सामंत यांनी भाजप च्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची ही तयारी सुरू केल्याची खळबळ जनंक माहिती या नेत्याने आज दिली.
…………………………..(समाप्त)……..
Average Rating