उध्दवजी तुम्ही मालवनात तरी जाऊन दाखवा…..!
मुंबई भाजपचे उद्धव ठाकरे यांना आव्हान
मुंबई,_उध्दव ठाकरे सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सल्ले देत आहेत,
अमेरिकेला काय जाता मणिपूरला जा… म्हणून मी तुम्हाला विचारतो मणिपूर सोडा, तुम्ही आधी मुंबईच्या मालवणीतला गेलात होतात काय…? स्वतः घरातून बाहेर पडायचं नाही, पडला तर थेट विमानातून लंडनला जायचं… तिथून मुंबईकरांची चिंता करायची म्हणजे काय? तर काहीच करायचं नाही.. आणि मोदीजींना सल्ला द्यायला निघाले, अशा शब्दांत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड.आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना फटकारले.
भाजपा महिला मोर्चाच्या दादर येथे आयोजित सहकार संस्था प्रशिक्षण कार्यक्रमात बोलताना अँड. शेलार यांनी काल उध्दव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला जोरदार उत्तर दिले.
तुम्हाला मुंबईच्या मालवणीत ही जायला जमत नाही. त्यामुळे तुम्ही मोदींना सल्ला देऊ नका, भाजपा
मणिपूर तर शांत करून दाखवेलच आणि मालवणीमध्ये वळवळ करणारी हिरवी चळवळ पण भाजपच शांत करेल, उद्धवजी तुमच्या गटात तो दम नाही,असा जोरदार टोलाही त्यांनी लगावला.
उपस्थितीत महिला भगिनीना आवाहन करताना ते म्हणाले की,सहकाराचे काम करताना एकमेकांच्या सहकारणी बना.पण राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्या म्हणून सांगतो विरोधकांनी विपर्यास प्रचार केला तर रणरागिनी पण बना. अशावेळी तुम्हाला रणरागिणी बनावेच लागेल. कारण खोटं बोलणाऱ्यांच पीक वाढलंय आहे.काळं म्हटलं की सफेद का नाही असं विचारायचं,सफेद म्हटलं की पिवळ का नाही,असं विचारायचं.. तर पिवळा म्हटलं तर लाल का नाही? असं विचारायचं हे उद्योग सुरु आहेत.म्हणून आजूबाजूला विरोधकांचा जो खोटा प्रचार सुरु आहे त्याकडे ही लक्ष द्यावे लागेल, असे आवाहनही त्यांनी केले.यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार गेल्या नऊ वर्षात महिलांसाठी संवेदनशील कसे काम करते आहे याचा सविस्तर उहापोह त्यांनी आपल्या भाषणात केला.
बरं झालं समान नागरी कायद्याला समर्थन तुम्ही दिले आहे. उबाठा ने समर्थन दिले आहे.पण त्यात माझी विनंती आहे असंच कृषी कायद्याला तुम्ही समर्थन करता म्हणून सभागृहात म्हणालात.मात्र बाहेर आल्यावर आणि जनतेत गेल्यावर युर्टन
र्घेतलात.युटर्नचा आजकाल दुसरा अर्थ म्हणजे उद्धव ठाकरे असे लोक बोलू लागलेत.त्यामुळे तुम्ही समान नागरी कायद्याला समर्थन बोलून दाखवले आहे.पण याच्यावर ना जनतेचा विश्वास आहे, ना आमचा विश्वास आहे.,असेही अँड.शेलार यांनी यावेळी नमूद केले.
……………………………..(समाप्त)……….
Average Rating