मुंबई,_ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र कल्याण मतदार संघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. “विरोधकांना दुसरं काही काम उरलेलं नाही.त्यांना एकच काम आहे, युतीत वितुष्ट कसं निर्माण होईल.” यांच्यामध्ये लाव्यालावी कशा करायच्या हेच त्यांचं ध्येय आहे. १९ जूनला शिवसेनेचा वर्धापन दिन आहे, असे सांगत त्यावरही खा. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी भाष्य केलंय.
सरकार मध्ये सर्व आलबेल आहे.सर्व गोष्टी एकत्रित व्यवस्थितपणे चालू आहेत. चांगल्या प्रकारे चालू आहेत. हे विरोधकांना बघवत नाही. त्यामुळे कुठेतरी या गोष्टी बोलून भडकवले जात आहे. पण आमच्यामध्ये सर्व गोष्टी चांगल्या चालू आहेत आणि महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याच,विकास करण्याचं काम सुरू आहे. गेल्या ११ महिन्यात जेवढी विकासाची कामे झाली ती याच्या अगोदर कधी झाली नसेल. त्यामुळे कुणी काहीही केलं तरी आमची युती कायम आहे. त्यात काहीही फरक पडणार नाही, असं म्हणत श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांना खडे बोल सुनावलं.
१९ जूनला शिवसेनेचा वर्धापन दिनाची तयारी सुरू आहे. मोठ्या संख्येने संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिक येतात. एक जंगी कार्यक्रम मोठा एक उत्साही कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडेल, असं म्हणत त्यांनी शिवसेना वर्धापन दिना वरही भाष्य केलंय.
…………………………………….(समाप्त)…………………….
Average Rating