शिवसेना (ऊबाठा) चे वरळीत राज्यव्यापी पदाधिकारी शिबीर…..?

Read Time:3 Minute, 47 Second

उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार……!

मुंबई, _शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे राज्यव्यापी पदाधिकारी शिबीर रविवार, १८ जून रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत एनएससीआय डोम, वरळी येथे होणार आहे.

या शिबिराला महाराष्ट्रातील तसेच इतर राज्यांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिबिराला मार्गदर्शन करणार आहेत.
महाराष्ट्रात ‘बेकायदा’ सरकारचा अनागोंदी कारभार सुरू आहे. वारकऱ्यांवर लाठय़ा चालवल्या गेल्या, तर शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली गेली. उद्धव ठाकरे रविवारी शिंदे – फडणवीस सरकारवर कोणते आसुड ओढतात आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांना कोणता संदेश देतात याकडे राज्याचेच नव्हे, तर अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिले आहे.

या शिबिराला नेते, उपनेते, सचिव, खासदार, आमदार, प्रवक्ते, समन्वयक, संघटक, मुंबई विभागप्रमुख, महिला विभाग संघटक, उपविभागप्रमुख, महिला उपविभाग संघटक, विधानसभा संघटक, महिला विधानसभा संघटक, विधानसभा समन्वयक, महिला विधानसभा समन्वयक, मुंबई मनपा नगरसेवक, जिल्हा संपर्कप्रमुख, महिला जिल्हा संपर्कसंघटक, जिल्हा सहसंपर्कप्रमुख, महिला जिल्हा सहसंपर्कसंघटक, विधानसभा संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख, महिला जिल्हासंघटक, उपजिल्हाप्रमुख, महिला उपजिल्हासंघटक तसेच युवासेना, भारतीय कामगार सेना, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ, अंगिकृत संघटना यांचे प्रमुख पदाधिकारी आणि इतर राज्यांतील पदाधिकारी यांनाच प्रवेश राहील.

शिबिराच्या पहिल्या सत्राचे उद्घाटन शिवसेना नेते व माजी मंत्री, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. पहिल्या सत्रात राज्याचे माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात कोविडवर जी यशस्वी मात केली त्यावर ध्वनिचित्रफीत दाखविण्यात येणार आहे. त्यानंतर शिवसेना नेते सुभाष देसाई व आदित्य ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील.

दुसऱ्या सत्राच्या प्रारंभी संगीतकार राहुल रानडे आणि सहकलाकार ‘शिवसेनेचा पोवाडा’ सादर करतील. त्यानंतर साईनाथ दुर्गे ‘माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभाव’ या विषयावर माहिती देतील. त्यानंतर विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची भाषणे होतील आणि सायंकाळी ४ वाजता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पदाधिकाऱ्यांना प्रमुख मार्गदर्शन करतील.
……………………………………………..(समाप्त)…………………….

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *