Onion Price : राज्यातील कांदा उत्पादक गेल्या 2 वर्षांपासून कांद्याला कवडीमोल दर मिळत असल्याने संकटात सापडले आहेत. कांद्याला मात्र दीड ते तीन रुपये प्रति किलो पर्यंतचा दर मिळत आहे. म्हणजेच रद्दीपेक्षाही कमी दरात कांदा विकला जात आहे.
बीआरएसचा मोठा निर्णय !
यामुळे कांदा उत्पादक अडचणीत आले आहेत. खरीप हंगामातील लाल कांदा देखील खूपच कमी भावात विक्री झाला आहे आणि आता उन्हाळी हंगामातील कांदा देखील लो दरात विक्री होत आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक बनत आहेत. दरम्यान कांदा प्रश्नाकडे बीआरएस पक्षाने लक्ष घातले आहे.
तेलंगाना येथील भारत राष्ट्र समिती अर्थातच बी आर एस पक्षाने महाराष्ट्रातील कांद्याच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले आहे. खरंतर बी आर एस पक्ष महाराष्ट्रात आपले पाय रुजवू पाहत आहे. यासाठी सीमावर्ती भागातील नांदेडमार्गे बी आर एस पक्ष महाराष्ट्रात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी लढा देत आहे.
बी आर एस पक्षाची राज्यात पकड मजबूत करण्यासाठी आता पक्षाचे महाराष्ट्रातील सक्रिय सदस्य तसेच माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी कन्नड सोयगाव मतदार संघातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे.
जाधव यांनी या मतदारसंघातील कांदा उत्पादकांचा कांदा तेलंगणात नेऊन विकण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. जाधव यांनी महाराष्ट्रात दीड ते तीन रुपये प्रति किलो या दराने विक्री होणारा कांदा तेलंगणात 18 रुपये किलो दराने विक्री होत असल्याचा दावा केला आहे.
यामुळे कन्नड सोयगाव मतदार संघातील कांदा उत्पादकांचा कांदा तेलंगाना मध्ये विक्री करण्यासाठी BRS पक्ष पुढाकार घेणार आहे. कांदा तेलंगणात घेऊन जाण्यासाठी पक्षाकडून व्यवस्था केली जाणार आहे.
विशेष बाब म्हणजे कांदा उत्पादकांसाठी बारदान मोफत पुरवले जाणार आहे आणि कांद्यासाठी लागणारी हमाली देखील कांदा उत्पादकांकडून घेतली जाणार नाही असे आमदार जाधव यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी नमूद केले आहे.
यामुळे ज्या शेतकऱ्यांना आपला कांदा तेलंगानात वाढीव दरात विकायचा असेल त्यांनी पक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन जाधव यांनी यावेळी केले आहे. खरं पाहता, कांदा हा राज्यातील शेतकऱ्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. कांद्याचे उत्पादन राज्यात मोठ्या प्रमाणात घेतले जाते.
राज्यातील बहुतांशी शेतकरी कांदा या नगदी पिकावर अवलंबून आहेत. यामुळे कांदा प्रश्नावर लक्ष घालून ‘अबकी बार किसान सरकार’ हे ब्रीदवाक्य घेऊन BRS पक्षाने महाराष्ट्रात आपले पाय रुजवण्याचा प्लॅन आखला आहे. मात्र पक्षाच्या या निर्णयामुळे कन्नड-सोयगाव मतदारसंघातील कांदा उत्पादकांचा फायदा होणार असे चित्र तयार होत आहे.
Average Rating