येत्या 36 तासांत ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ आणखी तीव्र होणार असून हे चक्रीवादळ भारताच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे. तसेच त्याचा भारतावर प्रभाव पडण्यास सुरुवात झाली असून देशातील चार राज्यांना हवामान खात्याने इशारा दिला आहे.
बिपरजॉयचा प्रभाव येत्या 36 तासांत देशातील कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र आणि गुजरात या चार राज्यांमध्ये दिसण्याची शक्यता आहे.या काळात दक्षिण अरबी समुद्राच्या आसपासच्या भागात 50 ते 60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत आहेत. त्यामुळे केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात आणि लक्षद्वीपच्या किनारपट्टीपासून मच्छिमारांना दूर राहण्याचा सल्ला भारतीय हवामान खात्याने दिला आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार या वादळामुळे ताशी 135 ते 145 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. त्यामुळे किनारपट्टी भागात मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे. एकंदरीत, या चक्रीवादळाचा परिणाम भारत, ओमान, इराण आणि पाकिस्तानसह अरबी समुद्राला लागून असलेल्या देशांवर होण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे

Average Rating