पुणे :राज्यातील अभियांत्रिकी, कृषि, औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सामायिक प्रवेश परीक्षेचा (एमएचटी-सीईटी २०२३) निकाल १२ जूनला सकाळी अकरा वाजता जाहीर करण्यात येणार आहे.
राज्यातील अभियांत्रिकी, कृषि, औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सामायिक प्रवेश परीक्षेचा (एमएचटी-सीईटी २०२३) निकाल १२ जूनला सकाळी अकरा वाजता जाहीर करण्यात येणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४साठी विविध व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या केंद्रिभूत प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने जूनपासून राबवण्यात येणार असून, प्रथमच मोबाइल ॲपद्वारे उमेदवारांना प्रवेश प्रक्रियेबाबत विविध टप्प्यांची माहिती, सूचना आणि जागा वाटपाबाबतची माहिती मिळेल.
सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाचे (सीईटी सेल) आयुक्त महेंद्र वारभुवन यांनी ही माहिती दिली. राज्य सामाईक प्रवेश परीक्षांतर्गत विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या १९ प्रवेश परीक्षांपैकी १७ परीक्षा घेण्यात आल्या असून त्यापैकी १६ परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. या परीक्षांना एकूण ९ लाख १३ हजार १६ विद्यार्थी उपस्थित होते. उर्वरित दोन परीक्षा जून आणि जुलैमध्ये घेण्यात येतील. बी. एस्सी नर्सिंग-सीईटी २०२३ ऑनलाईन सामाईक प्रवेश परीक्षा प्रथमच सीईटी कक्षामार्फत दिनांक १९ जूनला घेण्यात येणार आहे. त्यासाठी ३१ हजार ३८० विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. राज्यातील एकूण ७५ परीक्षा केंद्रावर परीक्षा होणार आहे.
Average Rating