मुंबई, _राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याच्या आलेल्या धमकी नंतर राज्यभरात खळबळ उडाली असतानाच खुद्द पवार यांनी यावर प्रतिक्रिया देत मी असल्या धमकीची चिंता करत नाही, धमक्यांना घाबरत नाही. ज्यांच्याकडे जबाबदारीची ही सूत्रं आहेत, त्यांना जबाबदारी टाळता येणार नाही,’ अशी स्पस्टक्ती शुक्रवारी येथे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली.
कोणत्याही घटनेवर मत मांडण्याचा देशाच्या प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. आणि धमक्या देऊन जर कोणाचा आवाज बंद करू शकेल असे कोणाला जर वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे. आपल्या धमकीची चिंता नाही, आपला राज्यातील पोलीसांवर विश्वास आहे असेही पवार यांनी नमूद केले.
शरद पवार यांना समाजमाध्यमावर तुमचा नरेंद्र दाभोळकर करू अशी धमकी आली आहे. त्यावर पवार प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की राज्याची कायदा आणि व्यवस्थेची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे त्यांनी यासंबंधी काळजी घ्यावी. राज्याचा कायदा आणि सुव्यवस्था राखणे याची जबाबदारी राज्य सरकारवर आहे. पोलिस दलावर आपला पूर्ण विश्वास आहे आणि धमकीची चिंता मी करत नाही असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
…………………………………(समाप्त)………….
Average Rating