दहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या………!

Read Time:2 Minute, 31 Second

राजगोपाल देवरा यांच्याकडे महसूल तर नगरविकास विभागाची जबाबदारी असीम कुमार गुप्ता यांच्याकडे

मुंबई,_राज्य सरकारने आणखी दहा वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून विनियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांची बदली महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव या पदावर केली आहे. मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम कुमार गुप्ता यांच्याकडे नगरविकास विभाग (१) ची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

गेल्या आठवड्यात जेष्ठ अधिकाऱ्यांच्या शासनाने बदल्या केल्या होत्या. जेष्ठ अधिकारी डॉ. नितीन करीर यांची बदली वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव म्हणून केली होती, मात्र त्यांच्याकडे महसूल विभागाचा अतिरिक्त कार्यभार होता.त्यामुळे महसूल विभागात आता राजगोपाल देवरा कार्यरत असतील. मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव भूषण गगरानी यांच्याकडे नगरविकास एक विभागाची देखील जबाबदारी होती. आता असीम कुमार गुप्ता नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असतील.

बदल्या पुढील प्रमाणे

राजेश कुमार, अपर मुख्य सचिव, ग्रामविकास विभाग – मदत व पुनर्वसन विभाग

अनुप कुमार, अपर मुख्य सचिव, सहकार व पणन विभाग – कृषी विभाग

राधिका रस्तोगी – प्रधान सचिव,पर्यटन विभाग

संजय खंदारे – प्रधान सचिव, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग

एकनाथ डवले, प्रधान सचिव कृषी विभाग – ग्रामविकास विभाग

सौरभ व्यास – प्रधान सचिव, पर्यटन विभाग – विकास आयुक्त,नियोजन विभाग

आर.एस.जगताप – उप महा, यशादा पुणे

जितेंद्र दुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सांगली – जिल्हाधिकारी सातारा
………………………………………(समाप्त)…………………..

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *