अपयशी गृहमंत्री फडणवीसांचा राजीनामा घ्या…….? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मागणी…….!

Read Time:5 Minute, 9 Second

मुंबई, _महाराष्ट्रात कटकारस्थान करुन सत्तेत आलेले शिंदे -फडणवीस सरकार कायदा सुव्यवस्था राखण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. राज्यात गुन्हेगारांचे मनोबल वाढले असून पोलीस कारवाई करण्यात अपयशी ठरत आहेत. राज्यात दंगली घडवण्याचा पहिला प्रयत्न मागील महिन्यात फसल्यानंतर आता पुन्हा औरंगजेबाचा मुद्दा पुढे करून वातावरण अशांत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचसोबत मुंबईसारख्या सुरक्षित शहरामध्ये एका विद्यार्थीनीची वसतीगृहात अत्याचार करून हत्या केल्याचे समोर आले आहे. राज्यात पोलिसांचे नाही तर समाजकंटकाचे आणि गुन्हेगाराचे राज्य असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांचे गृहखात्यावर आणि पोलिसांवर नियंत्रण राहिलेले नसून मुख्यमंत्री शिंदेंनी त्यांचा राजीनामा घेऊन सक्षम गृहमंत्री नेमावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी येथे केली.

अहमदनगर पाठोपाठ कोल्हापूर शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावरून पटोले यांनी आज राज्य सरकारला लक्ष्य केले. राज्यात धार्मिक दंगली घडवून राजकीय पोळी भाजण्याचा भाजपचा कुटील डाव असल्याचा आरोप पटोले यांनी आज केला.या सरकारच्या काळात औरंगजेबाचे उदात्तीकरण सुरु आहे. औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे आत्ताच बिळातून बाहेर कसे आले? राज्यात रोज दंगली सुरु असून मुख्यमंत्री आणि गृहमंत्री काय करत आहेत? असा सवालही त्यांनी केला.

शिंदे फडणवीस सरकार नपुंसक आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते ते खरेच आहे. संभाजीनगर, अहमदनगर, शेवगाव, अमरावती, नाशिकमध्ये धार्मिक मुद्द्यांना हवा देऊन राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न मागील महिन्यात झाला. पण लोकांनी सामंजस्याची भूमिका घेतल्याने तो प्रयत्न फसला. आता पुन्हा धर्मांध शक्ती अहमदनगर आणि कोल्हापूर जिल्ह्यात औरंगजेबाचा मुद्दा पुढे करुन वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलीस खात्याचा वचक असेल तर गुन्हेगारांची अशी हिम्मत होणार नाही. मात्र, फडणवीस जाणीवपूर्व अशा घटनांकडे दुर्लक्ष करत आहेत का?असा सवालही पटोले यांनी केला.

राज्यात कायदा सुव्यवस्था राखणे हे गृहविभागाचे काम आहे.पण गृहमंत्री आणि पोलीस यंत्रणा काय करते आहे? हा राज्यातील जनतेला पडलेला प्रश्न आहे. गुन्हेगारांना जरब बसेल अशी कारवाई होणे गरजेचे आहे.पण सरकार केवळ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये व्यस्त आहे. फडणवीस यांच्याकडे गृह खात्याबरोबरच अर्थ, ऊर्जा, गृहनिर्माण, राजशिष्टाचार अशा सहा विभागांचा कारभार असून सहा जिल्ह्यांचे ते पालकमंत्री आहेत. त्यामुळे ते गृह विभागाला योग्य न्याय देऊ शकत नाहीत. त्यामूळ फडणवीस यांच्याकडील गृहखाते तात्काळ काढून घ्यावा आणि राज्याला अनुभवी, सक्षम आणि पूर्णवेळ गृहमंत्री द्यावा, अशी मागणीही पटोले यांनी केली.

मुंबईतील चर्चगेट येथील वसतिगृहात एका महाविद्यालयीन तरुणीची हत्या केल्याचे उघड झाले आहे. मंत्रालय आणि मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असणाऱ्या मलबार हिल पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या वसतीगृहात दिवसाढवळ्या एका विद्यार्थीनीवर अत्याचार करून तिची हत्या केली जाते ही महाराष्ट्राला लाज आणणारी बाब आहे. मात्र सत्तेवर बसलेल्या लोकांना याचे काहीच वाटत नाही, ही अत्यंत दुर्देवाची गोष्ट आहे,असेही पटोले यांनी यावेळी नमूद केले.
…………………………………………..(समाप्त)…………………..
.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *