मुंबई,_“मुंबई शहरात पर्यटनवृद्धीला मोठी संधी आहे. जगभरातील पर्यटक मुंबईला आवर्जून भेट देतात. टेक एन्टरप्रिनर्स असोसिएशन ऑफ मुंबईबरोबरचा (टीम) सामंजस्य करार मुंबई शहरातील पर्यटन वाढीला चालना देणारा ठरेल”, असा विश्वास राज्याचे पर्यटन, महिला व बालविकास आणि कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी बुधवारी मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
लोढा यांच्या मंत्रालयातील दालनात या संदर्भात या क्षेत्रातील काही कंपन्यांशी करार करण्यात आले.यावेळी पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय,पर्यटन संचालक बी. एन.पाटील यासह टेक एन्टरप्रिनर्स असोसिएशनचे विशाल गोंदल, फेरजाद वरियवार उपस्थित होते.
लोढा म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई शहराचा कायापालट सुरू आहे.सुशोभिकरणाच्या कामांवर भर देण्यात आला आहे, रस्त्यांचे नूतनीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे आगामी काळात मुंबई शहराचा चेहरामोहरा बदललेला दिसेल.मुंबई शहरातील सर्व मेगा प्रकल्प पूर्ण झाल्यावर मुंबई शहर कसे दिसेल, हे अनुभवण्याची संधी मिळणार आहे.याशिवाय आभासी,वेब आणि मोबाईल यांसारख्या विविध माध्यमातून नागरिकांना बदलत्या मुंबईचे डिजिटल साक्षीदार होता येईल”. असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
………………………………(समाप्त)………………..
Average Rating