मुंबई, _आगामी लोकसभा निवडणूका लक्षात घेता किमान मुंबई पुरता बोलायचे झाल्यास प्रत्येक राजकीय पक्षांनी आपापल्या पद्धतीने कोणत्या ना कोणत्या वर्गाची एकगठ्ठा मतपेटी विचारात घेऊन गेल्या काही महिन्यांपासून मतांची बेगमी करण्यास सुरुवात केली असून, मग त्यात मुंबई भाजप कसे मागे राहील.. त्यातही आज दस्तुरखुद्द मुंबई भाजप अध्यक्ष आ. ॲडव. आशिष शेलार यांनी एक नवीन “जावईशोध”लावला असून खरे मुंबईकर हे मुंबईतले फेरीवाले असल्याचा धक्कादायक दावा केला आहे.
आज मुंबईतल्या फेरीवाल्यांचा विषय हा चिंताजनक बनत चालला असून दिवसेंदिवस त्याचे स्वरूप आक्राळ विक्राळ रूप घेत आहे. या व्यवसायात प्रामुख्याने उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड येथील काही कट्टर मुस्लिम मूलतत्ववादी व तडीपार गुंडांचेही प्रमाण लक्षणीय आहे. पूर्वी या धंद्यात मंगलोरी मुस्लिम समाजाचा वरचस्मा लक्षणीय होते. पण आता त्यांची जागाही खासकरून बांगलादेशी घुसखोरांनी घेतल्याचे मुंबई पोलिसांचा अहवालच सांगतो.
विशेषतः दक्षिण मुंबई व पूर्व उपनगरातल्या कोणत्याही भागात कोणत्याही फेरीवाल्यांकडून काही सामान खरेदी केल्यानंतर त्यांना पे टियम, किंवा जी पे, द्वारे त्याचे पैसे वळते केल्यास त्याचा मालक एखादा मुस्लिमच असल्याची आणखी भयावह, धक्कादायक व चिंता जनक वस्तुस्थिति समोर येते. आणि याचे प्रमाणही दखल घेण्याजोगे आहे. मुंबई शहर असो वा उपनगर येथीलच काही तथाकथित राजकारणी, पुरोगामी विचारवंत, वरिष्ठ पोलीस व महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने हा धंदा प्रचंड वेगाने जोर धरत आहे. इतकाकी आता याला आळा घालणंही जिकरीच झालं आहे.
काही दिवसांपूर्वी मुंबईतल्या फेरीवाल्यांचे त्रयस्थ सर्वेक्षण एका स्वयंसेवी संस्थेने केले असता असेही उघडकीस आले आहे की, फेरीवाल्यांचा नावाखाली येथून ड्रग्स व अन्य अमली पदार्थांची विक्री फार मोठ्या प्रमाणात केली जाते. शहरात होणाऱ्या तस्करीच्या मालाची अगदी राजरोस खरेदी विक्रीही मोठ्या प्रमाणात केली जाते व यातून होणाऱ्या प्रंचंड आर्थिक उलाढालीतून देशांत होणाऱ्या अतिरेकी कारवायांना ही फार मोठे फांडिंग केले जाते. त्यामूळे अनेक भागांत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांवर प्रचंड ताण पडतो. काही घटना अगदी अलिकडल्या काळात अशाही घडल्या आहेत की या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिस व मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जीवघेणे हल्लेही या अनधिकृत फेरीाल्यांकडून झालेले असून काहींनी यात आपला जीवही गमावला आहे. अगदीं शुल्लक कारणावरून ही हे फेरीवाले राजकीय आश्रयाच्या जोरावर निष्पाप फुटपाथ वरून चालणाऱ्या नागरीकांवरही जीवघेणे हल्ले बिनदिक्कत करतात.
ही सर्व वस्तुस्थिति जर लक्षात घेतली तर या वर कठोर उपाययोजना केली जाणे अपेक्षित असताना, भाजप सारखा राज्यातील व केंद्रातील एक मोठा व जबाबदार पक्षच जर यांना “हेच खरे मुंबईकर” व वेळ पडल्यास आपण स्वतः वकील या नात्याने न्यायालयात यांची बाजू मांडू पण यांना वाऱ्यावर सोडणार नाही असे जर ठामपणे जाहीर रित्या सांगत असेल तर येणाऱ्या काळात घडणाऱ्या घटनांना भाजप सह अन्यही सहानुभूतीदार पक्षही जबाबदार असतात.
मुंबईतील फेरीवाल्यांचे जगण्याचे, रोजीरोटीचे साधन हिरावून घेण्याचा प्रयत्न होत असेल तर आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. त्यांच्या बाजूने लढा देऊ, अशी भूमिका घेत अधिकृत फेरीवाल्यांच्या समस्या कायमच्या सोडवू असे आश्वासन मुंबई भाजपा अध्यक्ष आ. अॅड. आशिष शेलार यांनी दिले. ते मुंबई भाजपा हॉकर्स युनिटच्या वतीने आयोजित कार्यक्रमात आज बोलत होते. दादर येथील वसंत स्मृती कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
आ. अॅड. आशिष शेलार म्हणाले, फेरीवाल्यांच्या परिश्रमाची समस्यांची जाणीव आहे. ऊन, पाऊस, वारा याचा विचार न करता फेरीवाले बांधव व्यवसाय करतात. मुंबईतील गुन्हेगारी थांबली पाहिजे यासाठी कायदा व्यवस्थेला फेरीवाले मदत करतात. फेरीवाले ‘खरे मुंबईकर’ आहेत. आम्ही अनधिकृत फेरीवाल्यांची बाजू कधीच घेत नाही. सर्वोच्च न्यायालयाने ठरवलेल्या धोरणानुसार फेरीवाल्याना त्यांचे संविधानिक अधिकार मिळाले पाहिजेत असेही ते म्हणाले. याआधीच फेरीवाला धोरण अंमलबजावणी अपेक्षित होती. याबाबत महापालिका आयुक्तांशी चर्चा झाली आहे. महविकास आघाडी काळात व्हेडिंग कमिटीच्या निवडणुका झाल्या नाहीत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना निवडणुका झाल्या असत्या तर आज ही स्थिती उद्भवली नसती. फेरीवाल्या बांधवांसाठी कायदेशीर लढाईसाठी वकील म्हणून मी स्वतः उभा राहणार असल्याची ग्वाही मुंबई भाजपा अध्यक्ष आ. अॅड. आशिष शेलार यांनी यावेळी दिली.
यावेळी आ. कालिदास कोळंबकर, मुंबई भाजप हॉकर्स युनिटचे अध्यक्ष बाबूभाई भवानजी, अमरजीत मिश्रा यांच्यासह मोठ्या संख्येने फेरीवाले उपस्थित होते.
Average Rating