५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त राज्य सरकार विशेष टपाल तिकीट काढणार……!

Read Time:3 Minute, 55 Second

राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत आजच राजभवनात अनावरण

मुंबई, _छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षांनिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून राज्यात वर्षभर विविध कार्यक्रम राबविण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तुत्वाला मानवंदना देण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासनाने भारतीय टपाल विभागाच्या सहकार्याने एक टपाल तिकीट काढण्याचा निर्णय घेतला आहे.आजच राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राजभवन येथील दरबार हॉल मध्ये समारंभपूर्वक या तिकिटाचे अनावरण होणार आहे.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार,पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा,शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर,पोस्ट मास्टर जनरल सौ.स्वाती पांडे, प्रधान सचिव विकास खारगे,राज्यपालांचे सचिव संतोषकुमार प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

‘छत्रपती शिवाजी महाराज’ हा आमच्यासाठी चेतनेचा संचार करणारा प्रेरणामंत्र आहे.कित्येक राष्ट्रनायकांना लढण्याची आणि विजयाची गाढ प्रेरणा देणारे अद्वितीय व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असून त्यांचा विचार जगभरात जना जनांत आणि मना मनांत पोहोचविण्याचा दृढ निश्चय राज्य सरकारने घेतला असून याचाच एक भाग म्हणून महाराजांवरील पोस्ट तिकीट प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

शिवराज्याभिषेकाचे महत्व अधिक ठळकपणे अधोरेखित करण्याचा राज्य सरकारचा विचार असून माँ जिजाबाई यांची यामागील भावना, संकल्पना लोकांपर्यंत पोहोचण्याचा यामागील उद्देश आहे. महाराजांच्या काळांतील नाणी,गडकिल्ले,अष्टप्रधान मंडळ प्रत्येक गोष्ट ही प्रेरणादायी आहे; या प्रेरक गोष्टी सर्वांपर्यंत सहजपणे पोहोचविण्याला आपले प्राधान्य आहे.अस्मानी पातशाह्यांना टक्कर देणारा आणि स्वतःच्या जोरावर स्वराज्य स्थापन करणारा छत्रपती शिवाजी हे महान राजे खरे नायक आहेत; हे भावी पिढीलासुद्धा कळावे ही यामागील भावना असल्याचेही मुनगंटीवार यांनी नमूद केले.

शिववंदना कार्यक्रमाचे आयोजन………

टपाल तिकीट अनावरणा नंतर सांस्कृतिक कार्य संचलनालयाच्या वतीने शिववंदना या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहितीही मुनगंटीवार यांनी दिली.

………………………….(समाप्त)…………..

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *