नाशिक जिल्ह्यातील सूरगणा नगरपंचायतिच्या सहा नगरसेवकांसह आणि नवी मुंबईतील काही पदाधिकाऱ्यांनी काल वर्षा या निवासस्थानी येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी सामाजिक आणि राजकिय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यात सुरगाणा नगरपंचायतिचे नगराध्यक्ष भरत वाघमारे, गटनेता सचिन आहेर, नगरसेविका पुष्पाताई वाघमारे, नगरसेविका अरुणाताई वाघमारे, नगरसेविका प्रमिलाताई वाघमारे, नगरसेवक भगवान आहेर तसेच दिनेश वाघ, विलास गोसावी, भैरव सोनवणे, चोरोटकर यांचा समावेश होता.
तर नवी मुंबईतील अतिश घरत, सोमा घरत, शैलेंद्र सिंह, ललित घरत, शंकर पुजारी, संतोष वैती, गणेश वासकर, दिलीप सिंह, गिरीश पाटील, निखिल केशला या पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.
यावेळी शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के, शिवसेना उपनेते विजय नहाटा, नवी मुंबईचे माजी विरोधी पक्षनेते आणि नवी मुंबईचे जिल्हाप्रमुख विजय चौगुले, माथाडी कामगार सेनेचे जेरी डेव्हिड,माथाडी कामगार नेते ऋषिकांत शिंदे, नवी मुंबई संपर्क प्रमुख किशोर पाटकर आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
Average Rating