!मुंबई, -राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला असून मंत्रालय हे भ्रष्टाचाराचा अड्डा बनले आहे. कर्नाटकातील भाजपा सरकार ४० टक्के कमिशनवाले सरकार होते, राज्यातील शिंदे सरकारमध्ये त्यापेक्षा जास्त भ्रष्टाचार आहे. सरकार जनतेच्या महत्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे, केवळ मोठ मोठे इव्हेंट करुन प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी घणाघाती टीका विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी येथे केली.टिळक भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना थोरात म्हणाले की, राज्यातील सरकार जनतेच्या समस्या सोडवण्यात अपयशी ठरले आहे. शेतमालाला भाव नाही, भाजीपाला रस्त्यावर टाकण्याची वेळ आली आहे. अवकाळीच्या नुकसानीनंतर सरकारने विधानसभेत मदतीची घोषणा केली खरी, पण अद्याप ही मदत मिळालेली नाही. कांदा उत्पादक शेतकरी उद्धवस्त झाला आहे. कांद्याला अनुदान जाहीर केले.पण जाचक अटीमुळे ही मदतही शेतकऱ्याला मिळाली नाही. शेतकरी कर्जबाजारी झाला आहे, आत्महत्या वाढत आहेत. महागाईने जनता त्रस्त आहे, बेरोजगारी प्रचंड वाढली आहे आणि शिंदे सरकार मात्र मोठ मोठे इव्हेंट करण्यात मग्न आहे. शिंदे सरकारकडून लोकांना काय मिळाले तर केवळ पोकळ घोषणा मिळाल्या अशी परिस्थिती असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.लोकांचा काँग्रेसवरचा विश्वास वाढला…..लोकसभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी दोन दिवसांची बैठक टिळकभवन या पक्ष कार्यालयात पार पडली.या बैठकीत सर्व बाबींवर सकारात्मक चर्चा झाली. एकत्र लढून भाजपाचा पराभव करणे हा आमचा उद्देश आहे. ज्या जागा आमच्याकडे नाहीत पण त्या मतदारंसघात काँग्रेसची ताकद आहे त्या जागा काँग्रेसला मिळाव्यात यासाठी आम्ही आग्रह धरु. शिंदे-फडणवीस सरकारबद्दल राज्यात प्रचंड नाराजी आहे, जनता भाजपाच्या द्वेषाच्या राजकारणाला कंटाळली आहे. आम्ही एकत्र लढून लोकसभेच्या ४० जागा जिंकू शकतो असे चित्र आहे, असा दावाही यावेळी थोरात यांनी केला.राहुल गांधी यांच्या पदयात्रेचा कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीत प्रभाव दिसला. आता दुसरी पदयात्रा काढत असतील तर त्याचाही नक्कीच फायदा होईल. राहुल गांधी यांच्या पदयात्रेने इतिहास घडवला आहे. पदयात्रेत जनतेला भेडसावणाऱ्या प्रश्नांची चर्चा झाली. महागाई, बेरोजगारी, शेतकरी, कष्टकरी यांच्या समस्यांवर चर्चा झाली आणि हेच निवडणुकीतील मुद्दे असतील असेही त्यांनी यावेळी नमूद केले. ओडीशातील रेल्वे अपघातप्रकरणी रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यावा…….ओडिशातील बालासोर बहनागा बाजार स्टेशनजवळ झालेला रेल्वे अपघात शतकातील मोठा अपघात आहे. या अपघातील मृतांची संख्या पाहून मन सुन्न झाले. अपघातात एकही बळी जाऊ नये अशीच अपेक्षा आहे.परंतु,अपघात रोखणारे महाकवच मोठा गाजावाचा करु आणले होते ते कोठे गेले? एवढा मोठा अपाघात झाला त्याची जबाबदारी कोणावर तरी निश्चित झाली पाहिजे. ओडीशा अपघातीची नैतिक जबाबदारी म्हणून रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. अशी मागणीही थोरात यांनी केली.निळवंडे प्रकल्पाचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न…अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळी भागासाठीवरदान ठरणारा निळवंडे प्रकल्प व्हावा हे स्वप्न आम्ही पाहिले होते.आज आमचे स्वप्न पूर्ण होत असल्याचा आनंद होत आहे. या प्रकल्पासाठी शासन स्तरावर सातत्याने आम्ही पाठपुरावा केला त्यामुळेच आज दुष्काळी भागाला पाणी मिळत आहे. पण काही लोक निळवंडे प्रकल्पाचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. केवळ पाणी सोडण्याची संधी मिळाली म्हणजे काम त्यांनी केले असे होत नाही. जिल्ह्यातील जनतेला माहिती आहे की या प्रकल्पासाठी कोणी प्रयत्न केले. कोणी त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्नकरु नये, लोकांना पाणी मिळाले याचा आम्हाला आनंद आथोरायांनीस्पष्ट केले..
More Stories
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी घेतलेली जाहीर शपथ पूर्ण करणार
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकल मराठा समाज बांधवांशी संवाद साधताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, मी आपल्या प्रेमापोटी ह्याठिकाणी आलो आहे. दिलेला शब्द...
ही बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी….! शिवसेना खा.राहुल शेवाळे आणि मंत्री उदय सामंत यांची टीका…
शिवसेना खा.राहुल शेवाळे आणि मंत्री उदय सामंत यांची टीका मुंबई,दि.१(अनंत नलावडे)-देशभरातील सर्व भ्रष्ट नेते मुंबईत पर्यटनासाठी आले आहेत.एकेकाळी वंदनीय बाळासाहेबांवर...
स्वच्छतेबाबत हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करा….
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश मुंबई,दि.-‘मुंबईतील केवळ प्रमुख रस्तेच नव्हे,तर अगदी गल्लीबोळातून त्वरित स्वच्छता मोहीम राबवावी.तसेच स्वच्छतेबाबत हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई...
चारा उत्पादनासाठी डीपीडीसीतून निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
मुंबई,-राज्यात सर्वत्र पावसाने ओढ दिली असून त्यांचे गांभीर्य ओळखून संभाव्य परिस्थितीसाठी उपाययोजने करिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी बैठक...
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी १५० कोटी…!
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा मुंबई, दि.१०(अनंत नलावडे)- राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी महाराष्ट्र संशोधन,उन्नती आणि प्रशिक्षण प्रबोधिनीची (अमृत)...
Average Rating