जागावाटपावरून प्रदेश काँग्रेसची शरणागती…….!
मुंबई,-सत्तारूढ भाजपाचा पराभव करण्यासाठी आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूका महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढवाव्यात असा आघाडीतील दोन प्रमुख पक्ष शिवसेना उद्धव ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची ठाम भुमिका असताना, त्याच्या नेमकी विरोधी भूमिका विविध स्तरावर मांडणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी मतदार संघाच्या पदाधिकात्यांच्या संपन्न झालेल्या दोन दिवसीय आढावा बैठकीनंतर पदाधिकात्यांच्या रेट्यामुळे शनिवारी सपशेल शरणागती पत्करण्यास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना भाग पाडले.
आज संपलेल्या आढावा बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पटोले यांनी, काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग असून, कर्नाटक प्रमाणे काँग्रेसलाही येत्या लोकसभा निवडणुकीत मोठे यश मिळू शकते. पण या निवडणूका माविआ म्हणून एकत्रित लढल्या जाव्यात हा राज्यभरातील पक्षाचे आजी माजी खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष, व अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा आग्रह पाहता जागावाटपाची चर्चा महाविकास आघाडीच्याच बैठकीत करू अशी काहीशी मवाळ भूमिका स्वीकारत प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी अक्षारश शरणागतीच पतकारली. खुद्द पटोले यांनीच आढावा बैठक संपन्न झाल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत याला दुजोराही दिला.
प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला माजी राज्यमंत्री आ.सतेज पाटील,प्रदेश कार्याध्यक्ष आरिफ नसीम खान,बसवराज पाटील, चंद्रकांत हंडोरे, आ. प्रणिती शिंदे,आ.कुणाल पाटील,महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत,एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष आमिर शेख,प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, प्रमोद मोरे, प्रदेश निवडणूक समन्वय समितीचे सदस्य,लोकसभा मतदार संघातील प्रमुख नेते,जिल्हा प्रभारी,आजी माजी खासदार,आमदार,जिल्हाध्यक्ष,जिल्ह्यातील आघाडी संघटना व विभागाचे अध्यक्ष उपस्थित होते.
……………………………..(समाप्त)…………….
Average Rating