मुंबई -शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत शनिवारी पुन्हा एकदा आक्रमक पाहायला मिळाले. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे नाव घेऊन प्रसारमाध्यमांनी राऊत यांना आपल्यावर थुंकल्याचा आरोप केला जातो, तरं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सर्वांनी जबाबदारीने वागावे असा सल्ला देतात असे विचारले असता संजय राऊत यांनी आजही जोरदार पलटवार केला. ‘धरणात मुतण्यापेक्षा थुंकलेलं बरं’ असं म्हणत त्यांनी अजित पवार यांनाच जोरदार टोला लगावला. इतकेच नव्हे तर अजित पवार यांच्याबद्दल राऊत यांनी अप्रत्यक्षरित्या संतापही व्यक्त केला.
‘ज्याचं जळतं त्यालाच कळतं’, असं संजय राऊत म्हणाले. आम्ही काय भोगतो आहोत हे आमचं आम्हाला माहिती. आम्ही सर्व प्रकारचा त्रास सहन करुनही मूळ शिवसेना आणि ठाकरे कुटुंबाशी एकनिष्ठ आहोत. आम्हालाही अनेक प्रलोभन,दबाव आले. त्रास दिला गेला. पण आम्ही मागे हटलो नाही.आम्ही कधीही भाजपशी सलगी करायला गेलो नाही. आमच्या मनात तो विचारही येत नाही,अशा शब्दांमध्ये संजय राऊत यांनी अजित पवार यांना टोला लगावला.
मी सावरकरांचा भक्त म्हणत थंकण्याचे समर्थनच करण्याचा प्रयत्न……..
मी वीर सावरकरांचा भक्त आहे. एकदा वीर सावरकरांना न्यायालयात आणलं होतं. सावरकरांनी पाहिलं की, त्यांची माहिती देणारा बेईमान त्या न्यायालयाच्या कोपऱ्यात उभा आहे. त्याचवेळी वीर सावरकरही त्याच्याकडे बघून थुंकले.इतिहासात याची नोंद आहे. त्यामुळे बेईमानांवर थुंकणं ही हिंदू संस्कृती,हिंदूत्व याचा एक भाग आहे.संताप व्यक्त करणं आहे.पण मी कोणावरही थुंकलो नाही.पण वीर सावरकरांनी देखील आपला संताप हा बेईमानांवर, देशाच्या गद्दारांवर न्यायालयात थुंकूनच व्यक्त केला होता, अशी सारवासारव करत त्यांनी आपल्या कृत्याचे समर्थनच केले.
राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेत म्हटले की, शिंदे गटातील लोक बेईमान आहेत. त्यामुळे लोकच त्यांना जोडे मारत आहेत. लोक निवडणुकीची वाट पाहात आहेत,असे सांगतानाच माझ्या जिभेला दात लागतो. त्यामुळे मला थुंकण्यासारखी कृती करावी लागते.मात्र,या बिंडोक लोकांना असे वाटते की,लोक आपल्यावरच थुंकत आहेत. त्यांना स्वप्नातही वाटते की, लोक आपल्याला जोडे मारत आहेत.जर थुंकण्यावरुनच माफी मागायची असेल तर देशातील १३० कोटी जनतेलाच माफी मागावी लागेल. कारण, लोक दररोज कोठे ना कोठे थुंकत असतात,असे सांगत राऊत यांनी पुन्हा आपल्या कृतीचे ठामपणे समर्थनच केले.
…………………………….(समाप्त)…………
Average Rating