मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री करणार मुंबईत स्वागत मुबई दि 2- पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवार ३ जून २०२३ रोजी सकाळी अकरा वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून गोव्यातील पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेसला मडगाव रेल्वे स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवतील. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उद्याच म्हणजे ३ जूनला संध्याकाळी पावणे सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस,येथे वंदेभारत एक्स्प्रेसचे स्वागत करतील. पंतप्रधान मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ आणि आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीकोनातून, अत्याधुनिक वंदे भारत एक्स्प्रेसमुळे मुंबई-गोवा मार्गावरील दळणवळण सुधारेल आणि या भागातील लोकांना वेगवान आणि सुखकर प्रवास करण्याचे साधन उपलब्ध होईल.ही रेल्वे देशातील १९ वी आणि राज्यातील चौथी वंदे भारत रेल्वे असेल.ही रेल्वे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोव्यातील मडगाव स्थानकादरम्यान धावणार आहे.या दोन ठिकाणांना जोडणाऱ्या सध्याच्या वेगवान रेल्वे गाड्यांच्या तुलनेत वंदे भारत रेल्वे हा प्रवास सुमारे साडेसात तासांत पूर्ण करेल, यामुळे प्रवासाच्या वेळेत सुमारे एका तासांची बचत होईल. स्वदेशी बनावटीची,जागतिक दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज आणि कवच तंत्रज्ञानासह अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्यांसह असलेली ही रेल्वेगाडी दोन्ही राज्यांमध्ये पर्यटनाला चालना देईल. उद्घाटन सोहळ्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव दरम्यान धावणारी वंदेभारत एक्स्प्रेस ५ जून २०२३ पासून नियमित धावणार आहे. ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ५.२५ वाजता सुटेल, तर मडगाव येथे दुपारी १.१० वाजता पोहोचेल. त्यानंतर मडगाव येथून दुपारी २.४० वाजता सुटेल, तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे रात्री १०.३० वाजता पोहोचेल, अशी माहिती देण्यात आली. चेन्नईस्थित इंटिग्रेटेड कोच फॅक्टरीमध्ये सेमी हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेसची निर्मिती झाली आहे. देशभरात सध्या ७५ वंदे भारत सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, तर मुंबईतून गांधीनगर (गुजरात), शिर्डी आणि सोलापूरदरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत. या एक्स्प्रेसमुळे कोकण रेल्वेच्या मार्गावर प्रवाशांना वेगवान आणि आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. वंदेभारत एक्स्प्रेसची गेल्या महिन्यात कोकण रेल्वेच्या मार्गावर यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. उदघाटन सोहळ्यानंतर मडगावहून निघालेल्या वंदे भारत एक्स्प्रेसचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस स्वागत करतील, तसेच प्रवाशांशी संवाद साधतील.मडगाव ते मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचे थांबे खालील प्रमाणे… मडगाव, थिवीम, कणकवली, रत्नागिरी, खेड, पनवेल, ठाणे, दादर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस… ………………………….(समाप्त)………………
More Stories
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी घेतलेली जाहीर शपथ पूर्ण करणार
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकल मराठा समाज बांधवांशी संवाद साधताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, मी आपल्या प्रेमापोटी ह्याठिकाणी आलो आहे. दिलेला शब्द...
ही बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी….! शिवसेना खा.राहुल शेवाळे आणि मंत्री उदय सामंत यांची टीका…
शिवसेना खा.राहुल शेवाळे आणि मंत्री उदय सामंत यांची टीका मुंबई,दि.१(अनंत नलावडे)-देशभरातील सर्व भ्रष्ट नेते मुंबईत पर्यटनासाठी आले आहेत.एकेकाळी वंदनीय बाळासाहेबांवर...
स्वच्छतेबाबत हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करा….
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश मुंबई,दि.-‘मुंबईतील केवळ प्रमुख रस्तेच नव्हे,तर अगदी गल्लीबोळातून त्वरित स्वच्छता मोहीम राबवावी.तसेच स्वच्छतेबाबत हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई...
चारा उत्पादनासाठी डीपीडीसीतून निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
मुंबई,-राज्यात सर्वत्र पावसाने ओढ दिली असून त्यांचे गांभीर्य ओळखून संभाव्य परिस्थितीसाठी उपाययोजने करिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी बैठक...
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी १५० कोटी…!
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा मुंबई, दि.१०(अनंत नलावडे)- राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी महाराष्ट्र संशोधन,उन्नती आणि प्रशिक्षण प्रबोधिनीची (अमृत)...
Average Rating