‘राहुल गांधी माफी मांगो’ अशा घोषणांनी मंत्रालय परिसर दुमदुमला…
मुंबई,-राहुल गांधी हाय हाय, महिलांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींचा निषेध असो, महिलांओ का ये अपमान नही सहेगा हिंदुस्तान’, ‘राहुल गांधी माफी मांगो’ अशा घोषणा देत मुंबई भाजपा महिला मोर्चाच्या वतीने संसदेत फ्लाईंग किस केल्याप्रकरणी राहुल गांधींच्या विरोधात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.यावेळी भाजपा महिला मोर्चा प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ,मुंबई भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष शीतल गंभीर यांच्या नेतृत्वात गुरुवारी मंत्रालया शेजारील गांधी पुतळ्याजवळ भव्य आंदोलन करण्यात आले.
राहुल गांधी यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे की,रोड रोमिओ आणि त्यांच्यात काहीही फरक नाही.त्यांनी देशातील महिलांची माफी मागावी अशी तीव्र भावना भाजपा महिला मोर्चा प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ यांनी यावेळी व्यक्त केली.मोर्चात शेकडो महिला निषेधाचे बॅनर घेवुन सहभागी झाल्या होत्या. राहुल गांधींच्या विरोधातील घोषणांनी मंत्रालयाचा परिसर दणाणून गेला. या आंदोलनात रिटा मकवाना यांच्यासह भाजपा महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
………………..(समाप्त)…….
Average Rating