शेंडा पार्क येथे ११०० खाटाऐवजी६०० खाटांचे सामान्य रुग्णालय तर २५० खाटांचे कॅन्सर रुग्णालय…

Read Time:3 Minute, 42 Second

६०० खाटांचे सामान्य रुग्णालय तर २५० खाटांचे कॅन्सर रुग्णालय…

मुंबई,-कोल्हापूरच्या शेंडा पार्क येथील ११०० खाटा रुग्णालयाऐवजी ६०० खाटांचे सामान्य रुग्णालय तर २५० खाटांचे कॅन्सर रुग्णालयाचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी बुधवारी एका विशेष बैठकीत बोलताना दिल्या.

छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूर या संस्थेतील विविध सुविधांच्या उपाययोजना करण्याबाबत आज मंत्रालयात एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या सचिव डॉ.अश्विनी जोशी,शिक्षण व औषध द्रव्य विभागाचे आयुक्त राजीव निवतकर, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ.अजय चंदनवाले यांची प्रमुख उपस्थिती होती.

छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूर रुग्णालयातील इमारतींना रंगकाम,रस्ते दुरुस्ती,खिडक्या दुरुस्ती,दरवाजे दुरुस्ती,ड्रेनेज दुरुस्ती इत्यादी कामे करण्यासाठी ४८ कोटी ४५लाख रुपयांच्या रकमेसही यावेळी प्रशासकीय मान्यता देऊन ती कामे त्वरित सुरू करण्याच्या सूचनाही मुश्रीफ यांनी दिल्या

वैद्यकीय महाविद्यालयाच्या शेंडा पार्क येथील ऑडिटोरियम हॉलमधील नूतनीकरण करण्यासाठी ११ कोटी ५० लाख रुपयांची अतिरिक्त मागणी करण्यात आली असून ऑडिटोरियम हॉलमध्ये आवश्यक कामे करण्यासाठी सुधारित प्रस्ताव सादर करण्याच्याही सूचना मुश्रीफ यांनी दिल्या.

आता साताऱ्यातही रुग्णालयाचे नामकरण…..

सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सातारा या संस्थेचे “छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, यांचे आता सातारा” असे नामाधिकरण करण्यात आले असल्याची माहितीही यावेळी मुश्रीफ यांनी दिली .

सातारा येथे १०० विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित ५०० रुग्ण खाटांचे रुग्णालय सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे.मात्र संस्थेचे नामाधिकरणाचा अधिकृत शासन निर्णय आज जारी करण्यात आला असून त्यानुषगांने आवश्यक ती कार्यवाही वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे मुंबई येथील करीत असल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले.

……………………(समाप्त)………….

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *