मुंबई, -लोकमान्य टिळक टर्मिनस समोर, टिळक नगर चेंबूर येथील ऐतिहासिक महाबुद्ध विहार परिसराचे आणि भिक्खू संघाज युनाइटेड बुद्धिस्ट मिशन सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक भवनाचे सुशोभीकरण, नूतनीकरण आणि सौंदर्यीकरण करण्याकरिता जिल्हा नियोजन निधीतून १ कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
भिक्खू संघाज युनाइटेड बुद्धिस्ट मिशन सोशल, एज्युकेशनल आणि कल्चरल सेंटरच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात या प्रकल्पाचा शुभारंभही कारण्यात आल्याचे सांगतानाच,या प्रकल्पमार्फत भिक्खू संघाज युनाइटेड बुद्धिस्ट मिशन सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक भवनाचा पायाभूत विकास, नूतनीकरण त्यासोबतच स्किल सेंटर,अभ्यासिका आणि अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी पूज्य भदंत डॉ राहुल बोधी, अध्यक्ष, भि.सं.यू. बु. मिशन, उपस्थित होते. सोबतच मुंबई समाज कल्याणचे सहायक आयुक्त प्रसाद खैरनार, अनुसूचित जाती मोर्चा मुंबई अध्यक्ष शरद कांबळी आणि इतर संबंधित मान्यवरही उपस्थित होते.
………………(समाप्त)………….
Average Rating