प्रदेश काँग्रेसचा दावा..
मुंबई,दि.७(अनंत नलावडे) आपण देशातील हुकूमशाही विरोधात लढणारे नेते आहोत. देशातून मला हुकूमशाही हद्दपार करायची आहे, असा उभा दावा आजवर महाविकास आघाडीचे माजी मुख्यमंत्री व कट्टर भाजप विरोधक तथा नव्या इंडिया गटाचे खंदे पुरस्कर्ते उध्दव बाळासाहेब ठाकरे हे विवीध व्यासपीठावरून करत असताना, सोमवारी मात्र त्यांच्याच आघाडीचा एक मुख्य पक्ष असलेल्या काँग्रेसने अचानक यू टर्न घेत काँग्रेस नेते राहूल गांधी हेच हुकूमशाही विरोधात प्रामाणिकपणे लढणारे इमानदारीने लढणारे नेते आहेत असा दावा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.मात्र यावरून इंडिया व आघडीतही सर्व काही आलबेल असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना आज लोकसभा सचिवालयाने खासदारकी बहाल केल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारलेला आहेच. पण देशातील जनतेच्याही आशा पल्लवित झालेल्या आहेत असे सांगत,देशात सध्या हुकूमशाही कारभार सुरु असून या तानाशाही विरोधात इमानदारीने लढाणारा नेता अशी राहुल गांधी यांची प्रतिमा जनतेच्या मनात निर्माण झाली असल्याचे या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दावा केल्याने आता उध्दव ठाकरे हे काय भूमिका घेतात हे पाहणे अॉस्त्युक्याचे ठरणार आहे.
राहुल गांधी यांची खासदारकी कायम केल्याच्या मुद्द्यावर बोलताना पटोले म्हणाले की,सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती दिली. त्यानंतर सोमवारी लोकसभा सचिवालयाने त्यांची खासदारकी बहाल केली.राहुल गांधी यांच्याविरोधात नियोजनबद्ध पद्धतीने षडयंत्र रचून खोट्या केसमध्ये अडवण्याचा प्रयत्न भाजपाने केला, असा आरोपही पटोले यांनी केला.
कर्नाटकातील एका प्रचारसभेतील विधानावर सुरतच्या कोर्टात भाजपाचा स्थानिक नेता खोटी केस करतो व न्यायालय दोन वर्षांची शिक्षा ठोठावते, लगेच २४ तासाच्या आता राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली जाते व सरकारी निवासस्थानही सोडण्यास भाग पाडले जाते. हे सर्व राजकीय हेतूने करण्यात आले. शेवटी सुप्रीम कोर्टाने या शिक्षेला स्थगिती दिली, हे समाधानकारक असून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण होणे स्वाभाविक असल्याची भावनाही पटोले यांनी बोलून दाखवली.
………………….(समाप्त)………
Average Rating