….जातनिहाय जनगणना गरजेची…..!

Read Time:3 Minute, 48 Second

प्रदेश काँग्रेसची आग्रही भूमिका

मुंबई, दि.७(अनंत नलावडे)-देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात बहुजन समाजाचेही मोठे योगदान आहे. पण आजची परिस्थिती वेगळी आहे.जे लोक स्वातंत्र्य लढ्यात सहभागी नव्हते त्यांच्या हातात सत्ता गेली असून हेच लोक संविधान संपवण्याचे काम करत आहेत.भाजपा व मोदी सरकार हे बहुजन समाजाला फक्त मतांसाठी वापरून घेतात,अधिकार मात्र काहीच देत नाहीत.म्हणून बहुजन समाजाला जर न्याय मिळवायचा असेल तर जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे, अशी आग्रही भुमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी येथे एका मेळाव्यात बोलताना मांडली.

पटोले पुढे म्हणाले की, केंद्रात डॉ.मनमोहन सिंह यांचे सरकार असताना ओसीबी समाजाचा सविस्तर डेटा बनवला होता.पण नंतर आलेल्या नरेंद्र मोदी सरकारने तो जाहीर केला नाही.भाजपाच्या मनात पाप आहे, बहुजनांना फायदा होऊ नये ही त्यांची भुमिका असल्याचा आरोपही त्यांनी केला.

बहुजन समाजाला न्याय मिळावा यासाठी जस्टिस रेणके समितीने देशभरातून अभ्यास करुन केंद्र सरकारला अहवाल सादर केला. पण नंतर आलेल्या नरेंद्र मोदी सरकारने त्यावर उपसमिती नेमली व बहुजन समाजाला न्याय देण्यापासून वंचित ठेवले.काँग्रेसच बहुजन समाजाला न्याय देऊ शकतो.विधानसभेचा अध्यक्ष असताना मी स्वतः जातनिहास जनगणनेचा प्रस्ताव सादर करून तो मंजूर करुन घेतला.त्यानंतर देशातील इतर राज्यातून तसे प्रस्ताव मंजूर करणात आले, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

सर्व जातींना न्याय देण्याचा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी यांचा प्रयत्न आहे.केंद्रात काँग्रेस सत्तेत आल्यानंतर जातनिहाय जनगणना केली जाईल असे आश्वासन कर्नाटक विधानसभेच्या निवडणुक प्रचारात राहुल गांधी यांनी दिले आहे. बहुजन समाजाने आता जागे झाले पाहिजे आणि समाजाच्या हिताचे रक्षण करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची भुमिका घेतली पाहिजे, असे आवाहनही पटोले यांनी केले.

‘इंडिया’ का चालत नाही ?

पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना पटोले म्हणाले की, नरेंद्र मोदी यांच्या हुकुमशाही, मनमानी सरकारविरोधात देशभरातील प्रमुख पक्षांनी आघाडी स्थापन केली असून या आघाडीचे नाव ‘इंडिया’ असे ठेवण्यात आले आहे. या नावावरही भाजपा आक्षेप घेत आहे. भाजपाला मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया चालते तर मग ‘इंडिया’ का चालत नाही, असा टोलाही पटोले यांनी लगावला.
……………………………(समाप्त)…………..

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *