अँड आशिष शेलार यांचा पलटवार…
मुंबई, -जे मुख्यमंत्री माझे कुटुंब माझी जबाबदारी या पलिकडे कधी गेले नाहीत, जे स्वत: घरात बसून राहिले, अशा नॉन परफॉर्मिंग मुख्यमंत्र्यांना परफॉर्मिंग उपमुख्यमंत्री कसे कळणार?, असा रोखठोक सवाल करीत मुंबई भाजपा आमदार अँड आशिष शेलार यांनी सोमवारी येथे जोरदार पलटवार केला.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उध्दव ठाकरे यांनी रविवारी एका कार्यक्रमात बोलताना मस्टर उपमुख्यमंत्री असे संबोधले होते.त्यावर बोलताना आ.अँड.शेलार म्हणाले की,उध्दव ठाकरे यांची घरबश्या मुख्यमंत्री अशी ओळख झाली.
माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कालच्या टीकेला उत्तर देताना शेलार म्हणाले की, भाजपाची चिंता तुम्ही करु नका. तुमचे चिन्ह गेले, तुमचा पक्ष गेला, तुमंच नेतृत्व राहिले नाही, तुमचे संविधान गेले, तुमचे आमदार गेले, तुमचे खासदार गेले त्यांची चिंता तुम्ही करा.सतत सातत्याने दुसऱ्याच्या घरात डोकावून बघण्याचे सोडा, असा खोचक टोलाही लगावला.आमच्या नेतृत्वाबर तुम्ही बोलू नका.तुमचे आमदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटा दाखवून निवडून आले होते, तुमचे सुपूत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटा लावून निवडून आले आहेत,हे विसरु नका, असा मार्मिक सल्लाही त्यांनी दिला.
हिंदू जनआक्रोश मोर्चावर केलेल्या टीकेला उत्तर देताना शेलार म्हणाले की, तुमचे जे पाकडयांवरचे प्रेम आहे ते जनतेसमोर मांडण्यासाठीच हे मोर्चे निघत आहेत. आपली औरंगजेबाप्रती असलेली निष्ठा हे उघड करण्यासाठी हे मोर्चे आहेत.आणि हिंदू एकत्र आले की तुम्हाला त्रास का होतो, असा सवालही त्यांनी केला. गेली पंधरा वर्षांची त्यांची भाषणे ऐकली तर याच्या छाताडावर बसू, त्याच्या छाताडावर बसू यापेक्षा वेगळे काय बोलतात ? असा उपरोधिक सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
……………………………..(समाप्त)…………
Average Rating